Digital Debut | व्हिलन ते कॉमेडियन, अभिनेता रणजित यांचे डिजिटल विश्वात पदार्पण!

चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारा अभिनेता रणजितने डिजिटलमध्ये पदार्पण केले आहे.

Digital Debut | व्हिलन ते कॉमेडियन, अभिनेता रणजित यांचे डिजिटल विश्वात पदार्पण!

मुंबई : चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारा अभिनेता रणजित यांनी (Ranjit) डिजिटलमध्ये पदार्पण केले आहे. मात्र, यावेळी रंजीत हे खलनायक बनून कोणालाही घाबरायला किंवा धमकावणार नाही, तर ते त्याचा विनोदाने सर्वांना हसवणार आहे. ‘बेचारे’ वेब सीरीजच्या माध्यमातून त्यांनी डिजिटलमध्ये पदार्पण केले आहे. या वेब सीरीजचा पहिला भाग 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला असून आता दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. (Actor Ranjit’s debut in digital field)

बेचारे वेब सीरीजमध्ये चार तरुण मुलांची आणि एक मुलींची कहाणी आहे जे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन साधण्याच्या प्रयत्न करतात मात्र, हे करत असताना त्यांना अनेक अडचणी येतात. या वेब सीरीजमध्ये रणजितबरोबर अमित यादव, संदीप श्रीवास्तव, संभव जैन, हिमांशू भट्ट, प्रकाश चौधरी आणि मयुरी महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत.

रणजीत आपल्या डिजिटल पदार्पणाबद्दल म्हणाले की, मला एपिसोडिक वेब सीरीजमध्ये काम करण्याची इच्छा होती. पण या वेब सीरीजमध्ये मला यंग जनरेशनबरोबर काम करण्याची संधी मिळाली. यांच्यासोबत काम करताना मला एक वेगळा अनुभव मिळाला आहे.
बेचारे वेब सीरीज क्रांती प्रताप सिंह यांनी डायरेक्ट आणि राहुल दत्ता यांनी निर्मिती केली आहे. या वेब सीरीजबद्दल राहुल दत्ता म्हणाले की, ही वेब सीरीज तरुणांवर आधारित आहे.

प्रकाश झां दिग्दर्शित आश्रम बेव सीरिजचा पुढचा भाग लवकरच येणार आहे. याबद्दल बोलताना प्रकाश झां म्हणाले की, परिस्थिती थोडीशी ठीक होताच आम्ही शूटचे वेळापत्रक तयार करणार आहोत. सध्या गोष्टी थोड्या ठीक झाल्या आहेत मात्र, अलीकडेच एक नवीन व्हायरलबाबत ऐकायला येत आहे. ज्यामुळे शूटिंगला सुरूवात होण्यासाठी थोडा वेळ लागेल.

संबंधित बातम्या : 

फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार 2020 मध्ये ‘पंचायत’ आणि ‘पाताल लोक’ वेब सीरीज सर्वाधिक पुरस्काराचे मानकरी ठरले!

New Web Series | सनी लियोनीचा एक्शन धमाका, लवकरच ‘या’ वेब सीरीजमध्ये दिसणार !

(Actor Ranjit’s debut in digital field)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI