AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेता स्वप्नील जोशीची नवी भरारी, लवकरच सुरू करणार ‘भारताचा ओटीटी प्लॅटफॉर्म’!

आघाडीचा चित्रपट अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि प्रख्यात उद्योगपती नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) हे एकत्रितपणे ‘ओव्हर द टॉप’ (ओटीटी) प्लॅटफॉर्म सादर करत आहेत.

अभिनेता स्वप्नील जोशीची नवी भरारी, लवकरच सुरू करणार ‘भारताचा ओटीटी प्लॅटफॉर्म’!
स्वप्नील जोशी-नरेंद्र फिरोदिया
| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 2:43 PM
Share

मुंबई : आघाडीचा चित्रपट अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि प्रख्यात उद्योगपती नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) हे एकत्रितपणे ‘ओव्हर द टॉप’ (ओटीटी) प्लॅटफॉर्म सादर करत आहेत. हे व्यासपीठ भारतीय प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर दाखवणार आहे. लवकरच सुरु होत असलेले हे व्यासपीठ ‘भारताचे ओटीटी’ ठरणार असून, त्यावर हिंदी, मराठी, बंगाली आदी प्रादेशिक भाषांमधील चित्रपट, वेब सीरीज, मालिका दाखवल्या जाणार आहेत.

स्वप्नील जोशी त्याच्या चित्रपट आणि मालिकांमधील भूमिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचला आहे. ‘टामोरा डीजीवर्ल्ड’ या आपल्या कंपनीच्या माध्यमातून एक ओटीटी व्यासपीठ दाखल करावे, हा विचार गेले सुमारे दीड वर्षे तो करत असून, त्यावर त्याचे काम सुरु होते. त्याचवेळी फिरोदिया हेसुद्धा मराठी, गुजराती आणि इतर भाषांमधील कार्यक्रमासाठी ओटीटी प्लटफॉर्म असावा, यासाठी प्रयत्नशील होते. त्यांनी तशी घोषणा केली होती.

आपापल्या क्षेत्रातील हे दोन दिग्गज आता एकत्र आले असून त्यांनी हे व्यासपीठ अधिक मोठ्या प्रमाणावर दाखल करण्यासाठी भागीदारी केली आहे. त्याद्वारे आज प्रादेशिक कार्यक्रम ज्या प्रकारे ओटीटीवर सादर होतात त्याच्यात अमुलाग्र स्थित्यंतर घडून येणार आहे.

‘काही तरी वेगळे करायला हवे’ हा विचार!

“एक कलाकार म्हणून काहीतरी वेगळे करायला हवे, असे मनात सतत घोळत होते आणि त्यातून ओटीटी व्यासपीठ सुरु करावे असा विचार गेली दीड वर्षे मनात होता. याच प्रक्रियेत मग ‘टामोरा डीजीवर्ल्ड’ या कंपनीची स्थापना झाली. त्यासाठी काही समविचारी मित्र एकत्र आलो. आम्हाला लोकांना एक चांगले ओटीटी व्यासपीठ द्यायचे होते. दरम्यानच्या काळात, या प्रकल्पाबद्दल मी नरेंद्र फिरोदिया यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांच्याबरोबर माझे गेल्या कित्येक वर्षांचे संबंध आहेत. त्यांची आणि माझी व्यवसाय महत्वाकांक्षा, तत्त्वे अशा सर्वचपातळ्यांवर वेव्हलेन्थ जुळते. ओटीटीबद्दल चर्चा करत असताना त्यांनी मला सांगितले की त्यांनीही ‘लेट्सफ्लिक्स’ या ओटीटीची योजना आखली असून त्यावर ते प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रम दाखवणार आहेत. आम्ही त्याबाबत चर्चा केली आणि त्यानंतर दोघांनीही एकत्र येण्याचे ठरवले. दोन्ही प्रकल्प एकत्र करून मोठ्या प्रमाणावर ओटीटी व्यासपीठ दाखल करायचे ठरले,” असे स्वप्नील जोशी म्हणाला.

याबद्दल बोलताना स्वप्नील पुढे म्हणाला की, दोन मोठी नावे एकत्र येत असल्याने दाखल होणारा ओटीटी हा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सुरु होणार असून, तो जागतिक स्तरावर कार्यरत असेल. केवळ भारतातील प्रादेशिक भाषाच नव्हे, पण अगदी परदेशी भाषांमधील कार्यक्रमसुद्धा पुढे जाऊन या व्यासपिठावर दाखल होणार आहेत, असेही ते म्हणाले. एक जागतिक स्तरावरील कंपनी सुरु होईल, या उद्दिष्टाने खूप चांगल्या लोकांचा चमू यासाठी एकत्र आला आहे. या उपक्रमाचे नाव काय असेल, त्याचा शुभारंभ कधी होईल, त्या सगळ्याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

स्पर्धा करण्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर व्यासपीठ सुरु करू!

नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, एकमेकांबरोबर स्पर्धा करण्यापेक्षा स्वप्नील आणि त्यांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणावर हे व्यासपीठ सुरु करायचे असे ठरवले. “लॉकडाऊनमध्ये कित्येक ओटीटी प्लटफॉर्म सुरु झाले आणि विविध प्रकारचे कार्यक्रम त्यांच्यावर दाखवले जात आहेत. ओटीटीवरील कॉन्टेटसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ असून गेल्या काही वर्षांमध्ये ही बाब सिद्ध झाली आहे. या व्यासपीठांवर प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रमांना योग्य ते प्रतिनिधित्व मिळत नसल्याने आम्ही ‘लेट्सफ्लिक्स’सुरु करायचे ठरवले. भारतीय भाषांमधील चित्रपट, मालिका, कार्यक्रम त्यावर दाखाविण्याचा विचार होता. पण ‘लेट्सफ्लिक्स’ची घोषणा केल्यानंतर आणि त्याची सुरुवात करण्याची तयारी सुरु असतना तशाचप्रकारचा विचार स्वप्नील जोशी करत असल्याचे मला समजले. मग आम्ही भेटलो आणि मग विचार पक्का झाला की, एकमेकांबरोबर स्पर्धा करण्यापेक्षा एकत्रित येऊन अधिक भव्य प्रमाणात ओटीटी व्यासपीठ सुरु करायचे,” ते म्हणाले.

नरेंद्र फिरोदिया पुढे म्हणाले, “आम्ही हा ओटीटी भव्य प्रमाणावर दाखल करत आहोत. त्याचा फायदा सर्व भारतीय भाषांमधील कार्यक्रमांना होणार आहे. आमच्या प्रेक्षकांना भारतीय भाषांमधील दर्जेदार कार्यक्रम देण्याचा आमचा मानस आहे. हा खऱ्या अर्थाने ‘भारताचा ओटीटी’ असेल आणि आम्ही त्याच दृष्टीने नियोजन करत आहोत. या प्लटफॉर्मबद्दलची अधिक माहिती आम्ही लवकरच घोषित करणार आहोत.”

हेही वाचा :

Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडितचा स्वॅग पाहिलात?, नव्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

‘मला आजही मनासारखे चित्रपट मिळतात’, अभिनेत्री निशिगंध वाड यांनी व्यक्त केला आनंद!

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.