Bigg Boss OTT | ‘बिग बॉस ओटीटी’ची पहिली स्पर्धक जाहीर, ‘ही’ सुप्रसिद्ध गायिका दिसणार BB15च्या घरात!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Harshada Bhirvandekar

Updated on: Jul 31, 2021 | 10:48 AM

बिग बॉस ओटीटीच्या स्पर्धकांबद्दल बोलायचे तर वूटने शुक्रवारी संध्याकाळी उशिरा आपल्या पहिल्या स्पर्धकाचे नाव जाहीर केले आहे.

Bigg Boss OTT | ‘बिग बॉस ओटीटी’ची पहिली स्पर्धक जाहीर, ‘ही’ सुप्रसिद्ध गायिका दिसणार BB15च्या घरात!
नेहा भसीन

मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ (Bigg Boss OTT) चाहत्यांमध्ये खूप चर्चेत आहे. या शोच्या प्रत्येक सीझनला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले आहे. अशा परिस्थितीत, आता पुन्हा एकदा हा शो त्याच्या नवीन सीझनसह चाहत्यांना भेटीसाठी सज्ज आहे. विशेष गोष्ट म्हणजे टीव्हीवर येण्यापूर्वी ‘बिग बॉस 15’ ओटीटी प्लॅटफॉर्म Voot Select वर प्रदर्शित होणार आहे. आता या शोच्या पहिल्या स्पर्धकाचे नाव निश्चित झाले आहे.

अलीकडेच ‘बिग बॉस 15’च्या घरामधील काही फोटो लीक झाले आणि करण जोहर वूटवर शो होस्ट करताना दिसणार असल्याची खात्री झाली. अशा परिस्थितीत, आता बिग बॉस ओटीटीच्या स्पर्धकांबद्दल बोलायचे तर वूटने शुक्रवारी संध्याकाळी उशिरा आपल्या पहिल्या स्पर्धकाचे नाव जाहीर केले आहे.

‘बिग बॉस 15’मध्ये कोणाची एंट्री?

वूट सिलेक्टवरील व्हिडीओसह स्पर्धकाच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. ‘बिग बॉस ओटीटी’च्या पहिल्या सीझनची पहिली स्पर्धक प्रसिद्ध गायिका नेहा भसीन (Neha Bhasin) आहे. नेहा खूप प्रसिद्ध गायिका आहे. वूट सिलेक्टवर नेहाचा परिचय देणारा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यात ती ‘बाजरे दा सिट्टा’ हे गाणे गाऊन घरात प्रवेश करते.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Voot (@voot)

या व्हिडीओत ती असे म्हणताना दिसत आहे की, ‘बिग बॉसच्या घरात माझा आवाज ऐकायला तयार व्हा. हा आवाजही गातो आणि गर्जतो देखी. पण तो कोणाकडून दाबला जाऊ शकत नाही. मी बिग बॉस OTT वर येत आहे. आता तुम्ही मला 24 × 7 पाहू शकता’. एवढेच नाही तर, वूटने सोशल मीडियावर नेहाच्या डोळ्यांचे चित्र शेअर करून फक्त एक संकेत दिला आहे. यासह, चाहत्यांना नाव ओळखण्यास सांगितले आहे.

आता नेहा घरात जाणार आहे,  तेव्हा आता घरात खूप धमाल होणार आहे. नेहा बोल्ड आणि वेबॅक स्टाईलसाठीही प्रसिद्ध आहे. दुसरीकडे, बिग बॉस ओटीटीचा ट्विस्ट म्हणजे तो सलमान खान होस्ट करणार नाही. चाहते सलमान खानला फक्त टीव्हीवर होस्ट करताना पाहू शकतील.

शो टीव्हीवर प्रसारित होण्याच्या 6 आठवड्यांपूर्वी वूटवर प्रदर्शित होणार आहे. टीव्हीवरील ‘बिग बॉस 15’ ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होऊ शकेल. OTT वर, चाहते स्पर्धकांना हा शो 24 तास पाहता येणार आहे. हे स्पष्ट आहे की यावेळी हा शो नवीन पद्धतीने चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. आता इतर कोणते स्पर्धक घरात प्रवेश करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

(Bigg Boss OTT update Singer Neha Bhasin is the first contestant of Bigg Boss OTT)

हेही वाचा :

Money Heist 5 Teaser | प्रतीक्षा संपली, मनी हाईस्टचा पाचवा सीजन लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Shantit Kranti | भाडिपाची ‘शांतीत क्रांती’, नव्या वेब सीरीजसोबत चला धमाल रोड ट्रिपवर!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI