AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आर्याने माझे आयुष्य बदलले!’, ‘आर्या’चा नवा सीझन प्रदर्शित होण्यापूर्वी सुष्मिता सेनने व्यक्त केल्या भावना!

राम माधवानी दिग्दर्शित आर्या सीझन 2 लवकरच डिस्ने + हॉटस्टार वर प्रदर्शित होणार आहे. सुष्मिता सेन अभिनीत या ऍक्शन ड्रामाच्या पहिल्या सीझनचे खूप कौतुक झाले आणि अलीकडेच निर्मात्यांनी दुसऱ्या सीझनचा जबरदस्त टीझर प्रदर्शित केला. अभिनेत्री पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत परतत असून, आर्याने तिच्या आयुष्यावर केलेल्या प्रभावाबद्दल भाष्य केले.

‘आर्याने माझे आयुष्य बदलले!’, ‘आर्या’चा नवा सीझन प्रदर्शित होण्यापूर्वी सुष्मिता सेनने व्यक्त केल्या भावना!
Sushmita Sen
| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 1:42 PM
Share

मुंबई : राम माधवानी दिग्दर्शित आर्या सीझन 2 लवकरच डिस्ने + हॉटस्टार वर प्रदर्शित होणार आहे. सुष्मिता सेन अभिनीत या ऍक्शन ड्रामाच्या पहिल्या सीझनचे खूप कौतुक झाले आणि अलीकडेच निर्मात्यांनी दुसऱ्या सीझनचा जबरदस्त टीझर प्रदर्शित केला. अभिनेत्री पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत परतत असून, आर्याने तिच्या आयुष्यावर केलेल्या प्रभावाबद्दल भाष्य केले.

याविषयी बोलताना सुष्मिता सेन म्हणाली की, ‘मला वाटते की आर्यच्या आधी, मी एका कलाकाराप्रमाणे होते, वैयक्तिक आघाडीवरही मला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, सोबतच आव्हानात्मक अशा 5 वर्षांच्या कालावधीचा सामना केला आहे. मला असे वाटते की, जगाने मला बक्षीस द्यावे कारण. मी असे काम केले आहे जिथे पोहोचणे खूप कठीण आहे! आणि मी आर्याला ते बक्षीस म्हणू शकते. केवळ व्यावसायिक स्तरावर नाही, ती अगदी योग्य वेळी माझ्याकडे आली. आर्याची भूमिका साकारणे हा एक उत्तम अनुभव होता आणि तो यशस्वीपणे साकारण्यासाठी, कुटुंबाला एकत्र ठेवू शकणारी आई आणि स्त्री यांचे नाते दाखवणे, जरी कुटुंब अंडरवर्ल्ड आणि ड्रग माफियाशी संबंधित असले तरीही ती त्याला एकत्र जोडते.’

माझं आयुष्य बदललं!

सुष्मिता पुढे म्हणाली की, ‘मला वाटते आर्यने माझे आयुष्य अनेक पातळ्यांवर बदलले आहे. एक अभिनेत्री म्हणून आर्याचा एक भाग बनणे हा एक रोमांचक अनुभव होता आणि ही एक सुंदर सीरिज आहे. मला वाटते की हा एक अष्टपैलू अनुभव होता, ज्याने माझ्या आयुष्यात खूप चांगले बदल केले आहेत.’

नुकताच ‘आर्या 2’चा टीझर निर्मात्यांनी प्रदर्शित केला, ज्यामध्ये प्रेक्षकांना सुष्मिताच्या उत्कट व्यक्तिमत्त्वाला जवळून पाहण्याची संधी मिळाली, ज्यानंतर आता प्रत्येकजण सीरिजच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे.

‘आर्या’ परत आलीये!

आर्या परत आली आहे आणि यावेळी खूप काहीतरी मोठे आणि चांगले घडणार आहे. पहिल्या सीझनच्या अद्भूत यशानंतर, डिस्ने+ हॉटस्टार इंटरनॅशनल एमी नामांकित हॉटस्टार स्पेशल, आर्याचा आणखी एक पॉवर-पॅक आणि उत्साही सीझन घेऊन परतत आहे, जो सर्वांना प्रभावित करेल. ‘आर्या 2’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म डिज़्नी+हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

सुष्मिताचे धमाकेदार पुरागमन

सुष्मिता सेन (Sushmita Sen)  बॉलिवूडची एक प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिने आपल्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट कामगिरी केल्या आहेत. गेल्या वर्षी, सुष्मिता 10 वर्षांनी अभिनय क्षेत्रात परतली आहे. ती क्राईम सीरीज ‘आर्या’द्वारे (Aarya) प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. जेव्हा, बरेच कलाकार बऱ्याच काळानंतर चित्रपट आणि शोमध्ये परततात, तेव्हा त्यांना पूर्वीसारखा चांगला प्रतिसाद मिळत नाही, पण सुष्मिताने ‘आर्या’मधील तिच्या अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित केले.

हेही वाचा :

Bhumi Pednekar | सुंदर, सोज्वळ भूमी पेडणेकरच्या दिलकश अदा पाहून चाहतेही झाले घायाळ! पाहा फोटो…

Tusshar Kapoor Net Worth : करोडोंच्या संपत्तीचा मालक तुषार कपूर, ऑडी-बीएमडब्ल्यू सारख्या वाहनांचाही शौकीन!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.