Netflix वरील या वेब सीरिजची ‘स्क्विड गेम’शी होतेय तुलना; जाणून घ्या काय आहे खास?

या वेब सीरिजची तुलना प्रसिद्ध वेब शो 'स्क्विड गेम'शी केली जात आहे. स्क्विड गेमने ज्याप्रकारे लोकप्रियता निर्माण केली, त्याचप्रकारे या वेब सीरिजनेही प्रेक्षकांमध्ये रस निर्माण केला आहे.

Netflix वरील या वेब सीरिजची 'स्क्विड गेम'शी होतेय तुलना; जाणून घ्या काय आहे खास?
Netflix वरील या वेब सीरिजची 'स्क्विड गेम'शी होतेय तुलनाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 9:47 AM

Netflix हा असा एक OTT प्लॅटफॉर्म आहे, जो जगभरात प्रसिद्ध आहे. या प्लॅटफॉर्मवर केवळ प्रत्येक भाषेतील चित्रपट आणि वेब सीरिजच (Web Series) दिसत नाहीत, तर अनेक सिनेमे यावरच प्रदर्शित होतात. त्यांचा स्वतःचा ओरिजिनल कंटेटसुद्धा प्रेक्षकांना पहायला मिळतो. या प्लॅटफॉर्मवर ‘स्क्विड गेम’ (Squid Game) आणि ‘मनी हाईस्ट’सारखे वेब सीरिज खूप लोकप्रिय झाले. पण अलीकडे नेटफ्लिक्सला मोठा धक्का बसला आहे. सुमारे 10 लाख लोकांनी या डिजिटल प्लॅटफॉर्मला अनसबस्क्राईब केलं आहे. अशा परिस्थितीत नेटफ्लिक्सला मोठा फटका बसणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र अशी एक वेब सीरिज आहे, जी नेटफ्लिक्सचे चांगले दिवस पुन्हा आणू शकते. ही आतापर्यंतची सर्वात पॉवरफुल वेब सीरिज असल्याचं बोललं जात आहे.

या वेब सीरिजची तुलना प्रसिद्ध वेब शो ‘स्क्विड गेम’शी केली जात आहे. स्क्विड गेमने ज्याप्रकारे लोकप्रियता निर्माण केली, त्याचप्रकारे या वेब सीरिजनेही प्रेक्षकांमध्ये रस निर्माण केला आहे. दक्षिण कोरियाची ही वेब सीरिज नेटफ्लिक्सचं भविष्य बदलेल, असं म्हटलं जात आहे. एक्स्ट्राऑर्डिनरी अटर्नी वू (Extraordinary Attorney Woo) असं या दक्षिण कोरियाच्या वेब सीरिजचं नाव आहे. यात एका वकिलाची कथा दाखवण्यात आली आहे, जी न्याय मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या आव्हानाला सामोरं जाण्यास घाबरत नाही. ती तिच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना शक्य तितकी मदत करते. विशेष म्हणजे ती वकिल ऑटिस्टिक असते.

या वेब सीरिजमध्ये पार्क युन-बिन, कांग ते-ओह आणि कांग की-यंग सारखे उत्कृष्ट कलाकार आहेत. ही सीरिज 29 जूनपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होत आहे. सीरिजचा हा पहिला सीझन आहे आणि त्याला IMDb वर 10 पैकी 9.1 रेटिंग मिळालं आहे. ही सीरिज तुम्ही इंग्रजी सबटायटल्ससह पाहू शकता. दर आठवड्याला या वेब सीरिजचे दोन एपिसोड्स प्रेक्षकांच्या भेटीला येत असून एकूण 16 एपिसोड्सची ही सीरिज आहे. देशातली पहिली ऑटिस्टिक वकिल तिच्यासमोरील आव्हानांना सामोर जात कशा पद्धतीने कायदेशीर बाबी हाताळते, याचं सुंदर चित्रण या सीरिजमध्ये करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

नेटफ्लिक्स तोट्यात?

Netflix बद्दल बोलायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून या ओटीटी प्लॅटफॉर्मचा विकास झाला. परंतु अलिकडच्या काही महिन्यांत कंपनीला खूप तोटा सहन करावा लागला. नेटफ्लिक्स लवकरच स्वस्त योजना लॉन्च करू शकते अशीही चर्चा आहे.

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.