Lock Upp Show : Payal Rohatagi अडकणार लग्न बंधनात, बॉयफ्रेंड Sangram Singhने जाहीर केली लग्नाची तारीख

Lock Upp Show : Payal Rohatagi अडकणार लग्न बंधनात, बॉयफ्रेंड Sangram Singhने जाहीर केली लग्नाची तारीख
पायल रोहतगी, संग्राम सिंह
Image Credit source: पायल रोहतगी इन्स्टाग्राम

अभिनेत्री पायल रोहतगी लवकर लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. तिचा बॉयफ्रेंड संग्राम सिंहने ट्विट करत ही माहिती दिली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Mar 20, 2022 | 10:07 AM

मुंबई : आपल्या अतरंगी आणि वादग्रस्त विधानांनी कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatagi) लवकर लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. तिचा बॉयफ्रेंड संग्राम सिंहने (Sangram Singh) ट्विट करत ही माहिती दिली आहे. पायल रोहतगी सध्या कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) लॉकअप शोमध्ये (Lock Upp Show) पहायला मिळतेय. यात ती बॉयफ्रेंड संग्राम सिंहसोबतच्या नात्यावर बोलती झाली. काही दिवसांआधी साखरपुडा झाल्याचं ती यावेळी म्हणाली. त्याचाच व्हीडिओ शेअर करत संग्रामने लग्नाची तारीख जाहीर केली आहे. “पायल खूप चांगली मुलगी आहे. आम्ही खूप एकसारखे आहोत, एकसारखा विचार करतो. नात्यातील समानतेचा आम्ही आदर करतो. तसंच जगण्याचा प्रयत्न करतो. आम्ही मार्चमध्ये लग्न करणार होतो. पण पायल आता लॉकअप शोमध्ये आहे आणि मीही कामात थोडा बिझी आहे. त्यामुळे आम्ही असं ठरवलं आहे की माझ्या वाढदिवसाच्या आसपास आम्ही लग्न करू. देव सगळ्यांचं भलं करो”, असं ट्विट संग्रामने केलं आहे.

संग्रामचं ट्विट

पायल रोहतगी आणि तिचा बॉयफ्रेंड संग्राम सिंह लवकरच लग्न करणार आहेत. याची माहिती संग्रमने ट्विट करून दिली आहे.”पायल खूप चांगली मुलगी आहे. आम्ही खूप एकसारखे आहोत, एकसारखा विचार करतो. नात्यातील समानतेचा आम्ही आदर करतो. तसंच जगण्याचा प्रयत्न करतो. आम्ही मार्चमध्ये लग्न करणार होतो. पण पायल आता लॉकअप शोमध्ये आहे आणि मीही कामात थोडा बिझी आहे. त्यामुळे आम्ही असं ठरवलं आहे की माझ्या वाढदिवसाच्या आसपास आम्ही लग्न करू. देव सगळ्यांचं भलं करो”, असं ट्विट संग्रामने केलं आहे.

लॉकअप शोमध्ये पायल रोहतगी संग्राम आणि तिच्या नात्याबद्दल बोलती झाली. लॉकअपमध्ये ती रडत होती. यावेळी तिने संग्रामसोबच्या साखर पुड्यावर बोलली. “मी खूप दिवसांपूर्वी संग्रामसोबत साखरपुडा केला आहे. मला त्याच्यासोबत लग्नही करायचं आहे”, असं पायल म्हणाली.

पायल लॉकअपमधल्या क्विज टास्कमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.ती अनेकदा राजकीय मुद्द्यांवर आपली मतं मांडताना दिसते. पण पायलला या टास्क दरम्यान भारताचे राष्ट्रपती कोण?,या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही.

संबंधित बातम्या

लग्न करूनही Alka Yagnik नवऱ्यापासून 27 वर्षे राहिल्या दूर; काय होतं कारण?

‘The Kashmir Files टॅक्स फ्री केला मग आमचा Jhund का नाही?’; निर्मात्यांचा सवाल

स्पेनमध्ये Prabhasवर सर्जरी, शूटिंगदरम्यान झाली होती दुखापत; चाहते करतायत प्रार्थना

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें