Maharani 2 Trailer: मुख्यमंत्रीच्या भूमिकेत हुमा कुरेशीचं कमबॅक; राजकारणाचा ‘डर्टी गेम’ संपवण्याचा केला निर्धार

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: स्वाती वेमूल, Tv9 मराठी

Updated on: Aug 02, 2022 | 1:04 PM

राजकारण आणि त्यातील युक्त्या यावर आधारित 'महाराणी' वेब सीरिजचा पहिला सिझन प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. राणी भारती नावाच्या ग्रामीण वातावरणातील व्यक्तिरेखा साकारणाऱ्या हुमा कुरेशीला लोकांनी भरभरून प्रेम दिलं.

Maharani 2 Trailer: मुख्यमंत्रीच्या भूमिकेत हुमा कुरेशीचं कमबॅक; राजकारणाचा 'डर्टी गेम' संपवण्याचा केला निर्धार
Maharani 2 Trailer: मुख्यमंत्रीच्या भूमिकेत हुमा कुरेशीचं कमबॅक
Image Credit source: Youtube

अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) पुन्हा एकदा ओटीटी विश्वात दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या ‘महाराणी’ (Maharani season 2) या वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. राजकारण आणि त्यातील युक्त्या यावर आधारित ‘महाराणी’ वेब सीरिजचा पहिला सिझन प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. राणी भारती नावाच्या ग्रामीण वातावरणातील व्यक्तिरेखा साकारणाऱ्या हुमा कुरेशीला लोकांनी भरभरून प्रेम दिलं. आता हुमा पुन्हा एकदा राणी भारतीच्या (Rani Bharti) भूमिकेत परतली आहे. पण यावेळी सीरिजमध्ये बरेच रंजक ट्विस्ट्स आणि टर्न्स आहेत.

राणी भारतीची स्पर्धा पतीसोबत आणि विरोधकांशीही

महाराणी 2 च्या जवळपास अडीच मिनिटाच्या ट्रेलरमध्ये सर्व पात्रं त्यांचं स्थान आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी सर्व प्रकारच्या राजकीय युक्त्या वापरताना दिसतात. दुसऱ्या सिझनमध्ये यावेळी राणी भारती म्हणजेच हुमा कुरेशी थेट तिच्या पतीला टक्कर देणार आहे. राणी भारती या ‘नव्या बिहार’च्या मुख्यमंत्री म्हणून परतल्या आहेत आणि त्यांनी शपथ घेतली आहे की त्या राज्यातून सर्व गुंडांचा नायनाट करतील.

अनेक घटनांमुळे राजकीय उलथापालथ, राणी भारतीला घेराव घालण्याची तयारी

राजकीय उलथापालथ झाल्याच्या अनेक घटना बिहारमध्ये घडत असल्याचं ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे. सौंदर्य स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकाच्या मृत्यूने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दुसरीकडे जातीच्या नावावर होत असलेल्या भेदभावाची चर्चा सुरू आहे. दरम्यान एका मुलाने स्वतःला पेटवून घेतलं आहे. एकीकडे राणी भारती या सर्व समस्यांना तोंड देत असतानाच दुसरीकडे नवीन कुमार मुख्यमंत्री होण्यासाठी नवनवीन डावपेच आखू लागतात. एकीकडे राणी भारतीचा पतीसोबत संघर्ष सुरू आहे, तर दुसरीकडे विरोधकांनीही तिला घेरलं आहे.

पहा ट्रेलर

 

View this post on Instagram

 

A post shared by Huma S Qureshi (@iamhumaq)

महाराणी सिझन 2 येत्या 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार

राणी भारती (हुमा कुरेशी) चारही बाजूंनी समस्यांनी घेरलेली असते. पण ती या सर्वांचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. ट्रेलरमध्ये ती म्हणते, “परंपरा तोडण्यासाठी बनविली जाते आणि ती मोडण्यासाठी राणी स्वतः कुप्रसिद्ध आहे.” ‘महाराणी 2’ ही बहुप्रतिक्षित सीरिज येत्या 25 ऑगस्ट रोजी SonyLIV या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI