AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OTT 2021 | Netflixच्या कथा ठरल्या बदलत्या समाजाचा आरसा, ‘या’ अभिनेत्री देखील राहिल्या चर्चेत!

ओटीटी आल्यापासून हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींची अवस्था आणि दिशा दोन्ही बदलल्या आहेत. त्या आता सशक्त भूमिका आणि पात्रांच्या आकर्षक चित्रणासह डिजिटल विश्वावर राज्य करत आहे. नेटफ्लिक्सनेही अलीकडच्या काळात महिला-केंद्रित शोद्वारे भारतीय प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

OTT 2021 | Netflixच्या कथा ठरल्या बदलत्या समाजाचा आरसा, ‘या’ अभिनेत्री देखील राहिल्या चर्चेत!
OTT
| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 8:00 AM
Share

मुंबई : ओटीटी आल्यापासून हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींची अवस्था आणि दिशा दोन्ही बदलल्या आहेत. त्या आता सशक्त भूमिका आणि पात्रांच्या आकर्षक चित्रणासह डिजिटल विश्वावर राज्य करत आहे. नेटफ्लिक्सनेही अलीकडच्या काळात महिला-केंद्रित शोद्वारे भारतीय प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

नेटफ्लिक्सचा आपल्या कथांमध्ये विविध कार्यक्षेत्रातील स्त्री पात्रांद्वारे सर्वसमावेशकता दाखवण्याचा प्रयत्न आहे. 2021 मध्ये नेटफ्लिक्ससाठी गेम चेंजर्स बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही महिला पात्रांवर एक नजर टाकूया…

‘बॉम्बे बेगम’ची पूजा भट्ट

या सीरीज पूजा भट्टने ‘रॉयल बँक ऑफ बॉम्बे’चे नेतृत्व करणाऱ्या राणीची भूमिका साकारली होती. ती तिच्या कारकिर्दीत चांगल्या हुद्द्यावर आहे आणि तिचे वैवाहिक जीवन आनंदी आहे. परंतु, असे दिसते की तिच्या आयुष्यात काहीतरी कमी आहे. तिच्या सावत्र मुलांना ती आवडत नाही आणि लोक त्याच्या व्यावसायिक आयुष्यातही त्याला शार्कप्रमाणे मागे ओढत आहेत. या शोमध्ये पूजा भट्टने शानदार अभिनय केला आहे. सीरीजमधील सर्वात भावनिक सीन ती आणि तिची सावत्र मुलगी शाई यांच्यातला आहे. ती तिची वेदना आणि असहायता दाखवते, पण तरीही तिच्या पात्राची ताकद कुठेही कमी होत नाही.

‘हसीन दिलरुबा’मधील तापसी पन्नू

‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट एक थ्रिलर चित्रपट आहे, जो प्रेक्षकाला पूर्णवेळ जागीच खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. हा चित्रपट ज्वालापूर नावाच्या छोट्या शहराच्या पार्श्वभूमीवर बेतलेला आहे. यात अभिनेत्री तापसी पन्नू आणि अभिनेता विक्रांत मेस्सी यांनी साकारलेल्या राणी आणि रिशू या नवविवाहित जोडप्याची कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटात, राणी गृहिणी असून ट्रू-ब्लू क्राईम फिक्शनची चाहती आहे. दिनेश पंडित यांच्या कादंबऱ्या वाचण्यापासून ती स्वतःला रोखू शकत नाही आणि पुढे खऱ्या आयुष्यातही असचं काही होऊ लागतं.

‘पिट्टा कथलू’ मधील श्रुती हासन

नेटफ्लिक्सच्या पहिल्या तेलुगू इंथेलॉजीच्या केंद्रस्थानी स्त्रियांना ठेवण्यात आले आहे आणि त्या सत्ता बदलण्यासाठी संघर्ष करत असताना, त्यांच्या सत्तेच्या इच्छेबद्दल यावर बोलले गेले आहे. नाग अश्विनची एक्स-लाइफ ही कथा आपल्याला हे दाखवते की, या उदास पृथ्वीवर प्रेम कसे मृत झाले आहे,  आणि सोशल मीडिया आपल्यावर नियंत्रण ठेवत आहे. श्रुती हासनने कथेत तिची व्यक्तिरेखा उत्तम साकारली आहे. ती प्रथम प्रेमळ, नंतर धूर्त आणि नंतर अजिंक्य असल्याचे दाखवले आहे.

‘धमाका’तील अमृता सुभाष

अमृता सुभाषने ‘धमाका’मध्ये अर्जुन पाठकची बॉस ‘अंकिता’ची भूमिका साकारली आहे, जिला तिच्या करिअरमध्ये निवड करणे किंवा पुढे जाणे आणि तिच्या आंतरआत्म्याचे ऐकणे यासाठी कठीण गोष्टींचा सामना करावा लागतो. या चित्रपटात अमृता सुभाषला टीआरपीचे वेड लागलेल्या न्यूज प्रोड्युसरच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. धमाकेदार ब्रेकिंग न्यूजच्या बदल्यात ती तिच्या प्राइम टाईम शोमध्ये अर्जुन पाठकला परत आणण्याचे वचन देते.

हेही वाचा :

Rushikesh Wamburkar | कॉमेडीची बुलेट ट्रेननंतर, ‘A फक्त तूच’ चित्रपटात ऋषिकेश साकारणार ‘पक्या’ची भूमिका!

Attack : जानेवारीत होणार ‘अटॅक’! जॉन अब्राहमच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे टिझर रिलीज

Pushpa The Rise | प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधींची कमाई, अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’चा नवा विक्रम!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.