One Mic Stand : सनी लिओनीने शेअर केले ‘वन माइक स्टँड सीजन 2’ मधल्या स्टँड अप कॉमेडीचे अनुभव!

'वन माइक स्टँडच्या सीजन 2'चा अधिकृत ट्रेलरने दर्शकांचे लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. या शोमध्ये अनेक विनोदवीर सहभागी आहेत ज्यांनी विविध बैकग्राउंडमधल्या काही प्रतिभाशाली लोकांचे मेंटर बनले आहेत. (One Mic Stand: Sunny Leone shares her stand-up comedy experience in 'One Mic Stand Season 2'!)

One Mic Stand : सनी लिओनीने शेअर केले ‘वन माइक स्टँड सीजन 2’ मधल्या स्टँड अप कॉमेडीचे अनुभव!


मुंबई : एकाच छताखाली विविध प्रकारच्या प्रतिभाशाली कलाकारांनी एकत्र येऊन दर्शकांना हसवणे, मनोरंजक असेल. ‘वन माइक स्टँड’चा (One Mic Stand) नवीन सीजन येत असून यामध्ये विनोदाचा स्तर नक्कीच आधी पेक्षा एक लेवल पुढचा असणार आहे.

मागच्या शुक्रवारी ‘वन माइक स्टँडच्या सीजन 2’चा अधिकृत ट्रेलरने दर्शकांचे लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. या शोमध्ये अनेक विनोदवीर सहभागी आहेत ज्यांनी विविध बैकग्राउंडमधल्या काही प्रतिभाशाली लोकांचे मेंटर बनले आहेत. सनी लिओनी, जी बी-टाउनमधले महत्त्वाचे नाव असून तिने बी-टाउनमधले काही चित्रपट केले आहेत आणि आता स्टँड अप कॉमेडीमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे.

सनी लिओनीने भावना केल्या व्यक्त

या कार्यक्रमाविषयी आपले अनुभव शेअर करताना सनी लिओनी म्हणते की, “मला स्टँड अप कॉमेडी आवडते आणि मी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील काही कार्यक्रम पाहिले आहेत. एखाद्या कॉमेडियनला स्टेजवर परफॉर्म करताना पाहणे खूप सोपे आणि सहज वाटते, मात्र वास्तवात दर्शकांसोबत जोडून घेणे आणि त्यांना प्रत्येक विनोदावर हसवणे किती कठीण आहे, ही एक अशी गोष्ट आहे जी मी आता खूप जवळून शिकले आहे. एक कलाकार म्हणून, मी नेहमीच नव्या गोष्टी करून पाहू इच्छिते आणि दर्शकांना आपल्या अधिकाधिक स्किल्स दाखवू इच्छिते आणि म्हणूनच जेव्हा मला ‘वन माइक स्टँड 2’ मध्ये येण्याची संधी मिळाली तेव्हा मी ती लगेचच स्विकारली.”

“मी नेहमीच माझ्या चाहत्यांना आणि दर्शकांना काही वेगळ्या, नव नवीन गोष्टी देण्याचा प्रयत्न करत असते आणि हेच कारण आहे की या शोकडे मी लगेचच आकर्षित झाले. मी ‘वन माइक स्टँड’ च्या आधीच्या भागाचा भरपूर आनंद घेतला आहे. मला वाटते, हे प्रफुल्लित करणारे आहे, सेलिब्रिटी पाहुण्यांनी जे सादर केले ते अद्भुत होते, आणि त्यामुळेच त्या लेव्हलच्या तोडीस तोड देण्याचा दबाव होता. मला मोठे संवाद लक्षात ठेवणे आणि त्यांची फेक याची सवय आहे मात्र, लाइव परफॉर्म करणे रोमांचक असते. स्टँड अप कॉमेडी एक फैशन शो दरम्यान रॅम्पवर पडण्यापेक्षा देखील भीतीदायक असते, एखादा विनोद सांगणे आणि त्यावर कोणी हसलेच नाही तर याची मला सर्वात जास्त भीती वाटत होती. मला हे सांगायला आवडेल, मी स्वतःवर एकदोन विनोद करायला शिकले आणि आपल्या आजूबाजूच्या जगाकडे हलकेपणाने पाहायला शिकले. मला नीतिच्या सहयोगाचा आनंद आहे, ती प्रत्येक गोष्टीकडे नव्या आणि स्वाभाविक दृष्टिकोनातून पाहते. एक महिला म्हणून महिलांसोबत काम करणे नेहमीच मजेशीर असते कारण तुम्ही एकदुसऱ्याचा दृष्टिकोन आणि अनुभवांना समजता जसे दुसरे कोणी नाही समजू शकत आणि त्यामुळेच माझे सेटवरचे काम चांगले झाले आहे.”

सुप्रसिद्ध कॉमेडियन सपन वर्मा यांनी होस्ट केलेले, वन माइक स्टँड हा एक मनोरंजक आणि अनोखा शो आहे जिथे विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी प्रथमच स्टँड-अप कॉमेडी सादर करणार आहेत. प्रत्येक सेलिब्रिटीला एक स्टँड-अप कॉमेडियन नियुक्त केला जातो जो त्यांना स्टँडअप करण्यासाठी मार्गदर्शन करतो. या सीजनमध्ये अबीश मॅथ्यू, अतुल खत्री, समय रैना, सुमुखी सुरेश आणि पलटासारखे प्रतिभावान विनोदी कलाकार असून अनुक्रमे चेतन भगत, फेय डिसूझा, रफ्तार, करण जोहर आणि सनी लिओनी यांना मार्गदर्शन करणार आहेत. या सीरीजचे प्रीमियर 22 ऑक्टोबरला अमेझॉन प्राईम व्हिडीओवर होणार आहे.

संबंधित बातम्या

Abhishek Suhani Wedding : ‘ये है मोहब्बतें’ फेम अभिषेक मलिक गर्लफ्रेंड सुहानीसोबत लग्नबंधनात, पाहा फोटो

Katrina Kaif : ‘सूर्यवंशी’च्या प्रमोशनसाठी कतरिना कैफचा ग्लॅमरस अवतार, पाहा खास फोटो

‘होम मिनिस्टर’ची मानाची पैठणी देऊन आदेश बांदेकर भावोजींनी केला कतरीनाचा सन्मान! पाहा फोटो…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI