Pavitra Rishta 2.0 | ‘पवित्र रिश्ता 2.0’ची घोषणा, अंकिता पुन्हा बनणार ‘अर्चना’, सुशांतची जागा घेणार ‘हा’ अभिनेता!

टीव्ही क्वीन एकता कपूरचा प्रसिद्ध शो 'पवित्र रिश्ता 2.0'च्या (Pavitra Rishta 2.0) स्टारकास्टची घोषणा झाली आहे. अल्ट बालाजी (ALT Balaji) या प्लॅटफॉर्मवर येत असलेल्या या मोस्ट अवेटेड शोमध्ये अभिनेता शाहीर शेख ‘मानव’च्या भूमिकेत दिसणार आहे.

Pavitra Rishta 2.0 | ‘पवित्र रिश्ता 2.0’ची घोषणा, अंकिता पुन्हा बनणार ‘अर्चना’, सुशांतची जागा घेणार ‘हा’ अभिनेता!
पवित्र रिश्ता

मुंबई : टीव्ही क्वीन एकता कपूरचा प्रसिद्ध शो ‘पवित्र रिश्ता 2.0’च्या (Pavitra Rishta 2.0) स्टारकास्टची घोषणा झाली आहे. अल्ट बालाजी (ALT Balaji) या प्लॅटफॉर्मवर येत असलेल्या या मोस्ट अवेटेड शोमध्ये अभिनेता शाहीर शेख ‘मानव’च्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) ‘पवित्र रिश्ता’मध्ये ‘मानव’ची भूमिका साकारताना दिसला होता. या मालिकेत त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ‘अर्चना’च्या भूमिकेत दिसली होती. मात्र, यावेळीही अंकिता अर्चनाच्या भूमिकेत दिसणार आहे.

2009मध्ये सुरू झालेल्या या मालिकेत अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत दिसले होते. या मालिकेमधून अंकिता-सुशांतच्या जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. तथापि, आता सुशांत या जगात नाही. अशा परिस्थितीत अभिनेता शाहीर शेख या मालिकेत नवीन ‘मानव’ म्हणून दिसणार आहे. अलीकडेच अंकिता लोखंडे हिने या मालिकेच्या शूटिंगमधून स्वतःचा आणि शाहीरचा लूक शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ALTBalaji (@altbalaji)

अंकिताबरोबर दिसणार शाहीर

डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म अल्ट बालाजीने त्याच्या ऑफिशिअल इन्स्टाग्रामवर सगळ्या कलाकारांचे काही फोटो शेअर केले आहेत, जे शूटिंगच्या आधी काढण्यात आले होते. पहिल्या फोटोत शाहीर शेख अंकिता लोखंडेसमवेत हातात क्लॅप घेऊन पोज करताना दिसत आहे. तर, दुसर्‍या फोटोमध्ये उषा नाडकर्णी-शाहीर शेख एकत्र पोज करताना दिसू शकतात.

शोमध्ये ‘हे’ स्टार दिसणार मुख्य भूमिकेत!

तिसर्‍या फोटोमध्ये अंकिता सोलो पोज करताना दिसत आहे, तर चौथ्या आणि शेवटच्या फोटोमध्ये रणदीप राय आणि देव डी फेम अभिनेत्री असिमा वर्धन दिसत आहेत. या शोमध्ये रणदीप राय मानवच्या (शाहीर शेख) लहान भावाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर असीमा वर्धन रणदीप रायच्या मैत्रिणीची भूमिका साकारणार आहे.

अल्ट बालाजीवर होणार रिलीज!

‘पवित्र रिश्ता 2.0’च्या कलाकारांची घोषणा करताना या कॅप्शनमध्ये असे लिहिले होते की, “कधीकधी अगदी सामान्य जीवनात आपल्याला सर्वात विलक्षण प्रेम कथा आढळतात! मानव आणि अर्चनाच्या विलक्षण प्रेमकथेचे साक्षीदार व्हा. पवित्रा रिश्ता पुन्हा पुन्हा #ALTBalaji वर प्रसारित झाली आहे.” पोस्टनुसार अल्ट बालाजीवर प्रेक्षक ही मालिका पाहण्यास सक्षम असतील.

(Pavitra Rishta 2.0 ekta kapoor share first look of Serial Actors)

हेही वाचा :

सुनील शेट्टीच्या इमारतीत कोरोनाचा विस्फोट, मुंबई महानगरपालिकेने केली बिल्डींग सील!

Indian Idol 12 | इंडियन आयडॉल 12च्या स्पर्धेतून आशिष कुलकर्णी बाद, ‘हे’ असणार टॉप 6 स्पर्धक!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI