5

Vicky-Katrina Wedding | Amazon Prime ने विकत घेतले विकी-कतरिनाच्या लग्नाच्या टेलिकास्टचे हक्क? कोट्यवधींमध्ये झाली डील!

अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु होती आणि अखेर आता हे जोडपे लग्नबंधनात अडकणार आहे. विकी आणि कतरिनाच्या लग्नाची फंक्शन्स सुरू झाली असून, दोघेही 9 डिसेंबरला सात फेरे घेणार आहेत.

Vicky-Katrina Wedding | Amazon Prime ने विकत घेतले विकी-कतरिनाच्या लग्नाच्या टेलिकास्टचे हक्क? कोट्यवधींमध्ये झाली डील!
Vicky Kaushal-Katrina Kaif
Follow us
| Updated on: Dec 08, 2021 | 2:01 PM

मुंबई : अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु होती आणि अखेर आता हे जोडपे लग्नबंधनात अडकणार आहे. विकी आणि कतरिनाच्या लग्नाची फंक्शन्स सुरू झाली असून, दोघेही 9 डिसेंबरला सात फेरे घेणार आहेत. दोघांच्या लग्नाबाबत अनेक बातम्या समोर आल्या होत्या, यामध्ये प्रायव्हसीची विशेष काळजी घेतली जात आहे. एवढ्या प्रायव्हसीमागचे कारण आता समोर आले आहे.

चाहत्यांना विकी आणि कतरिनाच्या लग्नाचे प्रत्येक तपशील बघायला मिळणार आहे. परंतु, चाहत्यांना ही सर्व दृश्ये एका OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतील. होय, विकी आणि कतरिनाच्या लग्नाबाबत ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक मोठा करार झाला आहे. त्यानंतर एकही फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होऊ नये, म्हणून इतकी प्रायव्हसीची काळजी घेतली जात आहे.

कोट्यवधींमध्ये झाली डील!

मिड-डेच्या वृत्तानुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या लग्नाचे टेलिकास्ट हक्क अॅमेझॉन प्राईमला (Amazon Prime) विकले गेले आहेत. 80 कोटींमध्ये हा करार पूर्ण झाला आहे. या करारामुळेच कतरिना आणि विकीने त्यांच्या पाहुण्यांना एनडीएवर स्वाक्षरी करयला लावली आहे, जेणेकरून OTT प्लॅटफॉर्मच्या आधी लग्नाचा कोणताही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होणार नाही.

पुढच्या वर्षी रिलीज होईल व्हिडीओ!

विकी आणि कतरिनाच्या लग्नाच्या या सीरीजमध्ये त्यांच्या रोमान्सपासून ते रोका समारंभ आणि राजस्थानमधील चार दिवसांच्या फंक्शन्सपर्यंत प्रत्येक गोष्ट दिसणार आहे. विकी आणि कतरिनाच्या लग्नाचा हा व्हिडीओ 2022मध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 2019 मध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी देखील OTT प्लॅटफॉर्मवर त्यांच्या लग्नाच्या शूटची डील केली होती.

काय आहे एनडीए?

एनडीएमध्ये पाहुण्यांना प्रायव्हसीची काळजी घेणे आणि कार्यक्रमाच्या ठिकाणाहून कोणताही फोटो लीक करण्यास मनाई आहे. पाहुण्यांसाठी एक टीप शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतो की, तुम्ही तुमचे फोन तुमच्या खोलीतच ठेवा आणि समारंभातील कोणतेही फोटो पोस्ट करू नका किंवा सोशल मीडियाचा वापर करू नका. विकी आणि कतरिनाच्या लग्नाला 120 पाहुणे येणार आहेत.

विकी आणि कतरिना सवाई माधोपूरच्या सिक्स सेन्स फोर्ट बरवरामध्ये लग्न करणार आहेत. या लग्नाचे सोहळे सुरू झाले आहेत. मंगळवारी रात्री विकी आणि कतरिनाचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. या फंक्शनमध्ये दोन्ही कुटुंबांनी एकत्र खूप एन्जॉय केला.

हेही वाचा :

This week release | सुष्मिता सेनची ‘आर्या’ ते आयुष्मान खुरानाचा ‘चंडीगड करे आशिकी’, आठवडाभर मिळणार मनोरंजनाची मेजवानी!

Happy Birthday Dharmendra | मनोरंजन विश्वात येण्यापूर्वी धर्मेंद्र करायचे रेल्वेत नोकरी, दुसऱ्या लग्नासाठी बदलले नाव!

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding : विकी-कतरीनाच्या लग्नात पाहुण्यांना पाळावे लागणार हे नियम

Non Stop LIVE Update
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
'सैन्य कशाला हवं, ...तरी राऊत पळून जातील', कुणी उडवली राऊतांची खिल्ली?
'सैन्य कशाला हवं, ...तरी राऊत पळून जातील', कुणी उडवली राऊतांची खिल्ली?
'संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले की काय?', कुणी केला खोचक सवाल?
'संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले की काय?', कुणी केला खोचक सवाल?
भुजबळांचा जरांगे यांना सल्ला; 'मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा...'
भुजबळांचा जरांगे यांना सल्ला; 'मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा...'
'त्या' दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उद्योगमंत्र्यांना खोचक सवाल
'त्या' दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उद्योगमंत्र्यांना खोचक सवाल
'ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते', राऊतांवर कुणाचा निशाणा?
'ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते', राऊतांवर कुणाचा निशाणा?
आदित्य ठाकरे यांना भाजपचा खोचक सवाल, 'अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?'
आदित्य ठाकरे यांना भाजपचा खोचक सवाल, 'अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?'
शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून राऊत यांचं आव्हान काय? थेट म्हणाले...
शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून राऊत यांचं आव्हान काय? थेट म्हणाले...