AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samantar 2 : चक्रपाणीच्या डायरीतील भाकीत कुमारच्या बाबतीत खरे ठरणार?, चाहत्यांमध्ये ‘समांतर 2’ची उत्सुकता

एखाद्याला त्याचं सगळं भविष्य अगोदरच कळलं तर कदाचित स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो त्याला थोडाफार बदलण्याचा प्रयत्न करेल पण ते पूर्णपणे बदलणं शक्य आहे? याचं उत्तर मिळणार 1 जुलैला. (Fans are curious about 'Samantar 2')

Samantar 2 : चक्रपाणीच्या डायरीतील भाकीत कुमारच्या बाबतीत खरे ठरणार?, चाहत्यांमध्ये 'समांतर 2'ची उत्सुकता
| Edited By: | Updated on: Jun 30, 2021 | 5:31 PM
Share

मुंबई : तुमचं भविष्य तुमच्या हाती आलं तर? भविष्यात घडणाऱ्या घटना तुम्हाला आधीच कळल्या तर? किंवा मग अगोदरच जगलेल्या व्यक्तीचं कर्म तुमचं भविष्य आहे तर तुम्ही काय कराल? असंच काहीसं झालंय एमएक्स प्लेअरच्या समांतर-2 मधील कुमार महाजन म्हणजेच स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि सुदर्शन चक्रपाणी म्हणजेच नितीश भारद्वाज (Nitish Bharadwaj) यांच्यासोबत. त्यांच्या भविष्यरेखा एकमेकांना अगदी समांतर आहेत.

एखाद्याला त्याचं सगळं भविष्य अगोदरच कळलं तर कदाचित स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो त्याला थोडाफार बदलण्याचा प्रयत्न करेल पण ते पूर्णपणे बदलणं शक्य आहे? सिझन 2 च्या सुरुवातीला कुमार चक्रपाणीनं दिलेल्या डायरीतील रोज एक पान वाचत असतो जे त्याचे भविष्य असतं. कुमार त्याचं भविष्य नियंत्रणात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. काही प्रमाणात तो यशस्वी होतोही परंतु डायरीतील एका भविष्यानुसार एक स्त्री (सई ताम्हणकर) त्याच्या आयुष्यात येते आणि कुमार हळूहळू नियतीच्या फेऱ्यांमध्ये गुंतला जाऊ लागतो. सर्व गोष्टी नियंत्रणाबाहेर जातात.

चक्रपाणी यांचे कर्म ते आता कुमारचे भविष्य

भविष्य किंवा आपण ज्याला नियती म्हणतो त्याबद्दल स्वप्नील सांगतो ‘मेहनत आणि चिकाटीनं तुम्ही तुमचं भविष्य घडवू शकता, असे मी मानतो पण कधी कधी काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेरील असतात त्याला आपण काहीच करू शकत नाही. चक्रपाणी यांचे कर्म जे आता कुमारचे भविष्य आहे. कुमार त्याला आव्हान देतो मात्र त्यात तो यशस्वी होईल का? हे प्रेक्षकांना 1 जुलैलाच पाहायला मिळेल.”

ज्येष्ठ अभिनेते नितीश भारद्वाज याविषयी म्हणतात,”नियती ही आपल्या कृती आणि निर्णयाचे गणित आहे; म्हणूनच आपल्या कर्मावर निर्विकारपणे लक्ष केंद्रित करा आणि नियतीला तिचे काम करू द्या.”

ती स्त्री नक्की कोण?

ती स्त्री नक्की कोण? कुमार नियतीचा फेरा मोडणार की त्यात गुंतत जाणार? चक्रपाणीच्या डायरीतील भाकीत कुमारच्या बाबतीत खरे ठरणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं समांतर-2 च्या 10 भागांमध्ये दडली आहेत. ‘समांतर-2’ मराठी सोबतच हिंदी, तमिळ, तेलगू या भाषांमधून एमएक्स प्लेअर एक्सक्लुझिव्हवर  1 जुलैपासून प्रेक्षकांना विनामूल्य पाहता येणार आहे.

संबंधित बातम्या

Toofan Trailer Review | फरहानचा दमदार ‘अज्जू भाई’, परेश रावलही कोचच्या भूमिकेत अव्वल! पाहा ‘तूफान’चा ट्रेलर

Photo : Alessandro चा गेटअप, रणवीर सिंहच्या नव्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

Happy Birthday Avika Gor : ‘बालिका वधू’तील छोट्या आनंदीचा हॉट अँड बोल्ड अवतार, फोटोशूट्समुळे नेहमीच असते चर्चेत

काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.