पाकिस्तानमध्ये बॉलिवूड सिनेमांचा धुमाकूळ, लिस्टमधील हे टॉप 10 सिनेमे तुम्ही पाहिलेत का?
बॉलिवूडमधले चित्रपट फक्त भारतातच आवडतात असं नाही तर त्यांना जगभरात पसंती मिळते. एवढंच नव्हे तर शेजारच्या देशात, पाकिस्तानमध्येही हे चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. पाकिस्तानमध्ये नेटफ्लिक्सवरील टॉप 10 ट्रेंडिंग चित्रपटांमध्ये बॉलिवूड चित्रपटांचे वर्चस्व आहे.

हिंदी चित्रपटसृष्टी अर्थात बॉलिवूड फक्त भारतातच नव्हे तर जगभरात प्रख्यात आहे, अनेक हिंदी चित्रपट जगभरात आवडीने पाहिले जातात. इथल्या कलाकारांचे परदेशातही लाखो चाहते आहेत. एवढंच नव्हे तर आपल्या शेजारच्या देशाता, पाकिस्तानमध्येही हिंदी चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या बरीच आहे. विशेष म्हणते पाकिस्तानमध्ये नेटफ्लिक्सच्या टॉप 10 ट्रेंडिंग लिस्टमध्ये हिंदी चित्रपटांचंच वर्चस्व आहे. टॉप 10 चित्रपटांपैकी पाच (22 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर) बॉलीवूडचे होते. विशेष म्हणजे भारतात फ्लॉप ठरलेला चित्रपट अव्वल स्थानावर होता. तर 2025 मधील भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट हा या लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानी होता.
टॉप 10 चित्रपटांची लिस्ट
नेटफ्लिक्सवरील टॉप 10 लिस्टमध्ये ‘सन ऑफ सरदार ‘ हा चित्रपट पहिल्या स्थानावर आहे. खरतंर भारतात बॉक्स ऑफिसवर हा पिक्चर फ्लॉप छरला, पण पाकमध्ये तो या लिस्टमध्ये अव्वल स्थानी आहे. या चित्रपटात अजय देवगण, मृणाल ठाकूर, रवी किशन आणि नीरू बाजवा यांनी भूमिका केल्या होत्या.
सैयारा: या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ‘सैयारा’ चित्रपटआहे, जो या वर्षी भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. हा पिक्चर भारतात खूप हिट ठरला. अहान पांडेने या चित्रपटातून पदार्पण केलं.
धडक 2: या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ‘धडक 2’ आहे, जो या वर्षी प्रदर्शित झाला. हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
28 इयर्स लेटर: यादीत चौथ्या क्रमांकावर 28 इयर्स लेटर हा सायन्स फिक्शन हॉरर चित्रपट आहे. हा झोम्बी हॉरर चित्रपट डॅनी बॉयल यांनी दिग्दर्शित केला आहे.
मँटिस: यादीत पाचव्या क्रमांकावर दक्षिण कोरियन अॅक्शन थ्रिलर चित्रपट मँटिस आहे. ली ताई-सुंग दिग्दर्शित या चित्रपटाचा कालावधी 1 तास 53 मिनिटे आहे.
सेवेंथ सन, पॉप डीमन हंटर्स आणि मटेरियलिस्ट्स : या या यादीत सहाव्या क्रमांकावर ‘सेव्हन्थ सन’ हा एक डार्क फॅन्टसी ॲक्शन कॉमेडी चित्रपट आहे. सातव्या क्रमांकावर अमेरिकन ॲनिमेटेड चित्रपट के-पॉप: डेमन हंटर्स आहे. आठव्या क्रमांकावर अमेरिकन रोमँटिक कॉमेडी-ड्रामा चित्रपट ‘द मटेरियलिस्ट्स’ आहे.
इंस्पेक्टर झेंडे आणि तेहरान : तर मनोज बाजपेयी यांचा ‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा चित्रपट यादीत 9 व्या क्रमांकावर आहे, तर हिंदी स्पाय ॲक्शन थ्रिलर ‘तेहरान’ 10 व्या क्रमांकावर आहे.
