AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाते नव्हे, देश आणि धर्म पहिला! मायदेशाची थट्टा केल्याने अभिनेत्रीने थेट मोडले लग्न

पाकिस्तानी अभिनेत्री झोया नासीर (Zoya Nasir) हिने मंगळवारी ट्विट करत तिचा बॉयफ्रेंड, जर्मन ब्लॉगर ख्रिश्चन बेट्जमन (Christian betzman) याच्याशी ब्रेकअप केले आहे. ब्रेकअप करताना झोयाने असा आरोप केला की, ख्रिश्चन बेट्जमनने इस्त्रायली आणि पॅलेस्टाईन वादामध्ये पाकिस्तानाबद्दल ट्विट केले आणि पाकिस्तानला ‘थर्ड वर्ल्ड कंट्री’ म्हटले.

नाते नव्हे, देश आणि धर्म पहिला! मायदेशाची थट्टा केल्याने अभिनेत्रीने थेट मोडले लग्न
झोया नासीर आणि ख्रिश्चन बेट्जमन
| Updated on: May 28, 2021 | 5:09 PM
Share

मुंबई : पाकिस्तानी अभिनेत्री झोया नासीर (Zoya Nasir) हिने मंगळवारी ट्विट करत तिचा बॉयफ्रेंड, जर्मन ब्लॉगर ख्रिश्चन बेट्जमन (Christian betzman) याच्याशी ब्रेकअप केले आहे. ब्रेकअप करताना झोयाने असा आरोप केला की, ख्रिश्चन बेट्जमनने इस्त्रायली आणि पॅलेस्टाईन वादामध्ये पाकिस्तानाबद्दल ट्विट केले आणि पाकिस्तानला ‘थर्ड वर्ल्ड कंट्री’ म्हटले. याच गोष्टीमुले झोया संतापली आणि तिने ख्रिश्चनशी असलेले सर्व संबंध संपवण्याची घोषणा केली (Pakistani Actress Zoya Nasir break her engagement with boyfriend Christian betzman).

पेशाने जर्मन असणाऱ्या ख्रिश्चनने आपल्या ब्लॉगमध्ये पाकिस्तानचा उल्लेख तिसरा देश म्हणून केला होता. तो सध्या त्याच्या ब्लॉगमधून वादग्रस्त विषयांवर लिहित असतो.

ख्रिश्चन लिहिले…

वास्तविक, ख्रिश्चन हा एक जर्मन ब्लॉगर आहे. सध्या त्याच्या एका पोस्टवर बरीच खळबळ उडाली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, यावेळी प्रार्थना करून काही फायदा होणार नाही. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आवाज उठवलेल्या पाकिस्तानींवरही ख्रिश्चन यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ख्रिश्चनने पाकिस्तानी लोकांना सांगितले की, आपण आपल्या स्वत:च्या देशाचा नाश करत असताना, इतरांबद्दल वाईट वाटून घेऊ नका.

देशाबद्दल ऐकून झोया संतापली

यानंतर रविवारी झोयानेही तिचा निर्णय घेत सोशल मीडियावर पोस्ट केली. ती आणि ख्रिश्चन आता एकत्र नसल्याचे तिने सांगितले. त्यांनी साखरपुडा मोडला आहे. झोयाने लिहिले की, ‘माझ्या संस्कृतीबद्दल, माझ्या धर्माबद्दल त्याने दाखवलेली असंवेदनशीलता, माझ्या देशाबद्दल आणि माझ्या लोकांबद्दल त्याची अचानकपणे बदललेली भूमिका यामुळे मला हा कठीण निर्णय घेण्यास भाग पाडले आहे.’

एकमेकांचा आदर करा!

झोया पुढे म्हणाली, ‘येथे काही धार्मिक आणि सामाजिक सीमा आहेत, ज्या ओलांडल्या जाऊ शकत नाहीत. म्हणून मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. एकमेकांबद्दल नम्रता, सहनशीलता आणि आदर हे गुण नेहमीच आपण पाळले पाहिजे.’ पुढे झोया लिहिते, ‘मी माझ्या अल्लाहला प्रार्थना करीन की जगात सध्या होणाऱ्या भावनिक विध्वंसांना सामोरे जाण्यासाठी मला शक्ती द्या. मी ख्रिसच्या उज्ज्वल आणि आनंदी भविष्याची इच्छा व्यक्त करते.’  (Pakistani Actress Zoya Nasir break her engagement with boyfriend Christian betzman)

पाहा झोयाची पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Zoya Nasir (@zoyanasir)

ख्रिश्चन देखील दिले प्रत्युत्तर

झोयाचा होणारा नवरा ख्रिश्चन यानेही सोशल मीडियावर या विषयावर भाष्य केले आहे. त्याने आपल्या म्हणण्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. त्याने झोयाच्या या पोस्टला तिच्या इंस्टा स्टोरीवर एक पोस्ट लिहून प्रत्युत्तर दिले आहे. त्याने म्हटले की आपल्याला चांगले पाकिस्तान पाहायचे आहे, त्यामुळे आपण अशा प्रकारे पाकिस्तानवर टीका केली आहे.

ख्रिश्चनने पोस्टमध्ये नमूद केले आहे की त्याने कधीही कोणत्याही धर्म किंवा समाजाची चेष्टा केली नाही. तो म्हणतो, “मला माहित आहे की, इस्लाम हा शांतीचे प्रतीक आहे. परंतु, जेव्हा मी पाकिस्तानी लोकांच्या सोशल मीडिया कमेंट पाहतो, तेव्हा मला त्यात शांतता दिसत नाही. मी द्वेष आणि हिंसा पाहिले आहे. एखाद्याच्या शब्दांना वळवून एखाद्याचा तिरस्कार करणे सोपे आहे. मी नेहमीच पॅलेस्टाईन आणि माझ्या मुस्लिम बांधवांबरोबर राहिलो आहे, मी इस्त्राईलला कधीही पाठिंबा दिला नाही.’

(Pakistani Actress Zoya Nasir break her engagement with boyfriend Christian betzman)

हेही वाचा :

Photo : शाहरुखपासून ऐश्वर्यापर्यंत ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी नाकारले हॉलिवूडचे प्रोजेक्ट!

‘पीएम नरेंद्र मोदी’ फेम संदीप सिंह बनवणार ‘स्वातंत्रवीर सावरकरां’वर चित्रपट, महेश मांजरेकर सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.