AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परिणीती चोप्राने दिला बाळाला जन्म, मुलगा झाला की मुलगी? राघव चढ्ढाची पोस्ट व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकारणी राघव चढ्ढाच्या घरात अखेर लहान पाहुण्याचं आगमन झालं आहे. तिला आज सकाळी (19 ऑक्टोबर ) रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या काहीच वेळाने गुड न्यूज समोर आली की परिणीतीने बाळाला जन्म दिला आहे. त्यांच्या आयुष्यात आलेलं हे बाळ मुलगा आहे की मुलगी?

परिणीती चोप्राने दिला बाळाला जन्म, मुलगा झाला की मुलगी? राघव चढ्ढाची पोस्ट व्हायरल
Parineeti Chopra became a mother, gave birth to a baby, is the baby a boy or a girlImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 19, 2025 | 5:32 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकारणी राघव चढ्ढा यांनी त्यांच्या बाळाच्या आगमनाची टीजिंग करणारी एक पोस्ट शेअर केली होती तेव्हापासून चाहेतही त्यांच्या बाळाच्या प्रतिक्षेत होते. अभिनेत्रीच्या प्रसूतीबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहेत. परिणीती आई झाली असून तिने बाळाला जन्म दिला आहे. राघव चढ्ढा यांनी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली

परिणीती राघवच्या घरात छोट्या पाहुण्याचं आगम

रविवारी (19 ऑक्टोबर) रोजी सकाळी परिणीतीला दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी होती. ज्यामुळे तिच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांना चिंता वाटू लागली. आता, अखेर त्यांच्या घरात छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.

बाळ मुलगा की मुलगी?

राघव आणि परिणीतीने पोस्टमध्ये लिहिले, “शेवटी! आमचा मुलगा आला आहे! या लहान पाहुण्या येण्यापूर्वी आयुष्य कसे होते हे आम्हाला खरोखर आठवत नाही! आमचे हात आता आनंदाने परिपूर्ण भरले आहे आणि आमची हृदयही. आधी आम्ही एकमेकांसाठी होतो पण आता आमच्याकडे सर्वकाही आहे. प्रेम आणि कृतज्ञतेसह, परिणीती आणि राघव.” अशी पोस्ट राघव चढ्ढाने केली आहे. याचा अर्थ परिणीताला पुत्ररत्न प्राप्त झालं आहे.

चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव 

राघवची पोस्ट सोशल मीडियावर येताच चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. सर्वांनी या जोडप्याला त्यांच्या नवीन प्रवासासाठी प्रेम आणि आशीर्वाद पाठवले आहेत.

दोन वर्षांपूर्वी झाला होता शाही विवाह

24 सप्टेंबर 2023 रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे परिणीती आणि राघव यांचा भव्य विवाह सोहळा पार पडला. या लग्नाला बॉलिवूड आणि राजकारणातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. यापूर्वी, या जोडप्याने 13 मे 2023 रोजी लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते.

परिणीती आणि राघवची प्रेमकहाणी कशी सुरू झाली?

परिणीतीने एका पॉडकास्टमध्ये तिच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले होते. तिने सांगितले की ते लंडनमधील एका कार्यक्रमात भेटले होते. त्यानंतर काही ना काही कारणाने ते एकमेकांना भेटत राहिले अन् काही दिवसांतच त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.