AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parineeti Chopra | परिणीती चोप्रा हिच्या होणाऱ्या नवऱ्याचा आवडता आहे ‘हा’ खास पदार्थ, राघव चड्ढाचा खुलासा

बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. परिणीती चोप्रा हिचा नुकताच राघव चड्ढा याच्यासोबत साखरपुडा झाला आहे. अत्यंत राॅयल पध्दतीने दिल्ली येथे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा हा पार पडलाय. याचे अनेक फोटोही व्हायरल झाले.

Parineeti Chopra | परिणीती चोप्रा हिच्या होणाऱ्या नवऱ्याचा आवडता आहे 'हा' खास पदार्थ, राघव चड्ढाचा खुलासा
| Updated on: May 19, 2023 | 3:29 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा यांचा 13 मे रोजी दिल्ली येथे साखरपुडा पार पडलाय. साखरपुड्याच्या अगोदर बरीच वर्ष परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे एकमेकांना डेट करत होते. सर्वात अगोदर यांना मुंबईमध्ये स्पाॅट केले गेले. त्यानंतर बऱ्याच वेळा हे विमानतळावर देखील स्पाॅट झाले. मात्र, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) यांनी त्यांच्या नात्यावर भाष्य करणे नेहमीच टाळले होते. बरीच वर्ष डेट केल्यानंतर यांचा आता साखरपुडा पार पडला असून आॅक्टोबर महिन्यात यांचे लग्न होणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ (Video) हे सोशल मीडियावर व्हायरल झाले.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा अत्यंत राॅयल पध्दतीने साखरपुडा हा पार पडलाय. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी साखरपुड्याचे काही खास फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर केले. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे अत्यंत जबरदस्त लूकमध्ये दिसत होते. यांच्या साखरपुड्यातील एक खास व्हिडीओही तूफान व्हायरल होताना दिसला.

या व्हिडीओमध्ये लिपलाॅक करताना परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दिसले. अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा हा पार पडलाय. राघव चड्ढा याचे शिक्षण दिल्ली येथे झाले असून राघव चड्ढा हा आम आदमी पार्टीचा खासदार आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट ही लंडन येथे झाली.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राघव चड्ढा याने त्याचा आवडला पदार्थ आणि आवडत्या चित्रपटाबद्दल देखील सांगितले होते. राघव चड्ढा हा पंजाबी कुटुंबातील आहे. मात्र, त्याला पंजाबी पदार्थांपेक्षी अधिक चायनीज पदार्थ खाण्यासाठी आवडतात. दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे हा राघव चड्ढा याचा आवडचा चित्रपट आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुडयाला प्रियांका चोप्रा हिने देखील हजेरी लावली होती. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याला राजकिय नेते, बाॅलिवूडमधील काही खास लोक यांनी हजेरी लावली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री हे देखील परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यासाठी उपस्थित होते. चाहते आता परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?