माधुरी दीक्षितविषयी आक्षेपार्ह भाषा वापरणं Netflix ला पडलं महागात; काय आहे प्रकरण?

एका राजकीय विश्लेषकाने Netflix ला पाठवली नोटीस आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील एका शोमध्ये माधुरी दीक्षितविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्यामूळे Netflix वादाच्या भोवऱ्यात..

माधुरी दीक्षितविषयी आक्षेपार्ह भाषा वापरणं Netflix ला पडलं महागात; काय आहे प्रकरण?
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 11:07 AM

मुंबई : अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. बॉलिवूडची धक-धक गर्ल सोशल मीडियावर देखील कायम चर्चेत असते. माधुरीच्या चाहत्यांची संख्या जेवढी मोठी आहे, तेवढीच मोठी संख्या अभिनेत्रीच्या चांगल्या – वाईट काळात तिला पाठिंबा देणाऱ्यांची आहे. आता देखील एका प्रकरणी राजकीय विश्लेषकाने अभिनेत्रीची साथ दिली आहे. राजकीय विश्लेषकाने ‘बिग बँग थिअरी’ शोच्या एक एपिसोडसाठी स्ट्रीमिंग कंपनी नेटफ्लिक्सला नोटीस पाठवली आहे. राजकीय विश्लेषकाने शोमध्ये माधुरीविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा दावा केला आहे.

राजकीय विश्लेषक मिथुन कुमार यांनी नेटफ्लिक्सला नोटीस पाठवून ‘बिग बँग थिअरी’ शोच्या दुसऱ्या भागातील एक एपिसोड काढून टाकण्याची मागणी केली आहे. सिझनच्या पहिल्याच भागात जिम पार्सन्सने शेल्डन कूपर ही व्यक्तिरेखा साकारली आहे. जिम पार्सन्स या शोमध्ये माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय या दोघींची तुलना करताना दिसला होता.

हे सुद्धा वाचा

नेटफ्लिक्सला नोटीस पाठवत राजकीय विश्लेषक मिथुन कुमार म्हणाले की. ‘माधुरी दीक्षितबद्दल वापरण्यात आलेले शब्द फक्त आक्षेपार्ह नाही तर बदनामीकारकही आहे.’ मिथुन कुमार यांनी नेटफ्लिक्सला एपिसोड काढून टाकण्याची विनंती देखील केली आहे. मिथुन विजय कुमार यांनी याबाबतचं एक ट्वीटही केलं आहे. सध्या त्याचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मिथुन कुमार ट्विट करत म्हणाले, ‘नुकताच मी नेटफ्लिक्सवर बिग बँग थिअरी या शोचा एक भाग पाहिला. पहिल्या भागात एक अभिनेता माधुरी दीक्षितबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानास्पद शब्द वापरतो. मी लहानपणापासून माधरी दीक्षित चाहता आहे. त्यामुळे माधरी दीक्षितविषयी वापरण्यात आलेले शब्द ऐकून मला वाईट वाटंल..’

पुढे मिथुन कुमार म्हणाले, ‘स्त्रिया आणि भारतीय संस्कृती यांचा अपमान झाल्याची भावना माझ्या मनात आली. म्हणून मी माझ्या वकिलामार्फत नेटफ्लिक्सला कायदेशीर नोटीस पाठवण्याचा विचार केला. या प्रकरणी नेटफ्लिक्सवर योग्य तो निर्णय घेईल अशी मी अपेक्षा करतो..’ असं देखील मिथुन कुमार ट्विट करत म्हणाले.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.