AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकीय मेळाव्यांना खच्चून गर्दी होते, रेस्टॉरंट, पब्ज सुरू आहेत, मग चित्रपटगृह का सुरू होत नाही?; मनसेचा सवाल

राजकीय मेळाव्यांना खच्चून गर्दी आहे…रेस्टॉरंट्स, पब्जमध्ये तुडुंब पार्ट्या सुरु आहेत… मॉल्समध्ये खरेदीसाठी झुंबड उडालेली असते… पण तरीही नाट्यगृहं-चित्रपटगृहं अजूनही पन्नास टक्के क्षमतेनेच चालवायची असा महाआघाडी सरकारचा अजब न्याय आहे.

राजकीय मेळाव्यांना खच्चून गर्दी होते, रेस्टॉरंट, पब्ज सुरू आहेत, मग चित्रपटगृह का सुरू होत नाही?; मनसेचा सवाल
| Edited By: महेश घोलप | Updated on: Feb 13, 2022 | 2:50 PM
Share

मुंबई – कोरोनाच्या (corona) कारणामुळे अनेकांना व्यवसायात आणि नोकरीत तोटा सहन करावा लागला होता. दोन वर्षात अनेकांना कोरोनाचा सामना करावा लागला. तसेच अनेकजण आपल्या जवळचे सोडून गेले आहेत. कोरोनाची नियमावली लागू केलेली अजून काही प्रमाणात असल्याचे आपणास पाहावयास मिळत आहे. कारण आता सगळीकडे गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. परंतु नाट्यगृह-चित्रपटगृह अजूनही पन्नास टक्के क्षमतेने सुरू असल्याने मनसेच्या (mns) चित्रपटसेनेने राज्य सरकारला आग्रहाची मागणी केली आहे. कारण आत्तपर्यंत राजकीय मेळाव्यांना खच्चून गर्दी, रेस्टॉरंट्स, पब्जमध्ये तुडुंब पार्ट्या सुरु आहेत आणि मॉल्समध्ये खरेदीसाठी झुंबड उडालेली असते. पण लोकांच्या मंनोरंजानाचं साधन अजून का बंद ठेवलं आहे. त्यामुळे अनेक कित्येक लोकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतोय असं प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर (amey khopkar) यांनी केला आहे.

प्राजक्ता माळी काय म्हणाल्या

‘पावनखिंड’ सारख्या भव्य ऐतिहासिक चित्रपटापासून १०० टक्के आसनक्षमतेने चित्रपटगृहं सुरु करावीत, ही मनसे चित्रपटसेनेची आग्रही मागणी आहे. त्याचबरोबर अभिनेत्री प्राजक्ता माळी हीने सुध्दा ‘पावनखिंड’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे, तसेच तो अनेकांना आवडताना दिसत आहे. तो चित्रपट सगळ्यांना आवडेल अशी आम्हाला खात्री आहे. फक्त सरकारला आमची एकचं विनंती आहे, की सगळीकडे कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे चित्रपट आणि थिअटर पुर्ण क्षमतेने सुरू करावी. राज्यातले अनेक ठिकाणचे सगळे नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे नाट्यगृह-चित्रपटगृह सुरू करावीत. शिवजयंती सुध्दा आता जवळ आली त्यामुळे आम्हा सगळ्या कलाकारांची अशी विनंती आहे की, थिअटर सुरू व्हावेत. आम्हाला आशा आहे की राज्य सरकार याबाबत आता सकारात्मक पाऊल उचलेलं

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेची मागणी

राजकीय मेळाव्यांना खच्चून गर्दी आहे…रेस्टॉरंट्स, पब्जमध्ये तुडुंब पार्ट्या सुरु आहेत… मॉल्समध्ये खरेदीसाठी झुंबड उडालेली असते… पण तरीही नाट्यगृहं-चित्रपटगृहं अजूनही पन्नास टक्के क्षमतेनेच चालवायची असा महाआघाडी सरकारचा अजब न्याय आहे. हा अन्याय आतातरी सरकारने दूर करावा. ‘पावनखिंड’ सारख्या भव्य ऐतिहासिक चित्रपटापासून १०० टक्के आसनक्षमतेने चित्रपटगृहं सुरु करावीत, ही मनसे चित्रपटसेनेची आग्रही मागणी आहे.

किरण मानेंच्या विरोधात मनसे मैदानात, ‘इतर कलाकारांना त्यांनी त्रास दिला, योग्य वेळेस उत्तर देऊ!’

Ameya Khopkar | जास्मिन वानखेडे आमच्या पक्षात काम करतात याचा आम्हाला अभिमान : अमेय खोपकर

Video: राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागरांना ‘पुष्पा’ने लावले वेड; म्हणतात…!

Follow Us
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड