AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठमोळ्या अभिनेत्रीचं अपहरण, 3 महिने एकाच ठिकाणी डांबून ठेवलं आणि… स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी केलेली सुखरुप सुटका

इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना सेलिब्रिटींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एका मराठमोळ्या अभिनेत्रीचं तर, अपहरण करण्यात आलं होतं, तब्बल तीन महिने अभिनेत्रीला एकाच ठिकाणी डांबून ठेवण्यात आलेलं... तेव्हा स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी तिची सुखरुप सुटका केली.

मराठमोळ्या अभिनेत्रीचं अपहरण, 3 महिने एकाच ठिकाणी डांबून ठेवलं आणि... स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी केलेली सुखरुप सुटका
Balasaheb Thackeray
| Updated on: Apr 08, 2026 | 10:41 AM
Share

झगमगत्या विश्वातून कायम धक्कादायक गोष्टी समोर येत असतात, ज्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण असतं… अभिनेत्रींना तर अनेक भयानक अनुभव येत असतात. आता देखील अशीच एक घटना समोर येत आहे. मराठमोळ्या अभिनेत्रचं एका निर्णात्याने अपहरण केलं होतं. तब्बल तीन महिने अभिनेत्री एका ठिकाणी निर्मात्याने ठेवलं होतं. धक्कादायक गोष्ट म्हणजे, अभिनेत्रीला कुटुंबियांसोबत फोनवर बोलण्याची परवानगी होती, पण मराठी बोलायचं नाही… असं धमकावून सांगण्यात आलं होतं… तेव्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी अभिनेत्रीची सुखरुप सुटका केली.

सध्या ज्या अभिनेत्रीच्या अपहरणाची चर्चा सुरु आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री सुप्रिया पाठारे आहे. सुप्रिया यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही, अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण जेव्हा त्यांचं अपहरण झालं होतं, तेव्हा कुटुंबिय प्रचंड घाबरलेले आणि स्वतः स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी अभिनेत्रीची सुखरुप सुटका केली.

सांगायचं झालं तर, सुप्रिया पाठारे यांनी एका मुलाखतीत 1995 साली घडलेली धक्कादायक घटना सांगितली. सुप्रिया पाठारे म्हणाल्या, एका सिनेमाच्या शुटिंगसाठी त्यांनी एका निर्णात्याने राजस्थान येथे नेलं होतं… तेव्हा त्या एकट्याच शुटिंगसाठी गेलेल्या. पण निश्चित स्थळी पोहोचल्यानंतर परिस्थिती काही वेगळीच होती. त्या निर्मत्याने सुप्रिया यांना तब्बल तीन महिने एकाच ठिकाणी डांबून ठेवलं होतं…

एवढंच नाही तर, बंदुकीची भीती देखील दाखवून बळजबरी अभिनय करुन घेतला. सुप्रिया यांना फोनवर कुटुंबियांसोबत बोलण्याची परवानगी दिलेली. पण मराठीत बोलायचं नाही.. असं स्पष्ट सांगण्यात आलेलं… अशात अभिनेत्रीने गुप्त भाषेचा वापर केला आणि बहिणीला सर्वकाही सांगितलं…

पण जेव्हा सुप्रिया पाठारे निर्मात्याच्या तावडीतून सुटल्या, तेव्हा त्यांना कळलं की, या प्रकरणात बाळासाहेबांनी स्वतः लक्ष घातलं होतं. 20 तास प्रवास करुन सुप्रिया सुरक्षित सुरत येथे पोहोचल्या… यावर सुप्रिया म्हणाल्या, ‘मी आयुष्यभर त्यांची ऋणी राहीन…’

सुप्रिया पाठारे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांंनी ‘पिंजरा’, ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘मोलकरीणबाई’, ‘होणार सून मी या घरची’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...