AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकदा संपलं की संपलं..; झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेनं निरोप घेतल्यानंतर अभिनेता भावूक

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. पावणेतीन वर्ष.. 850 एपिसोड्स.. 2000 पेक्षा जास्त सीन्स.. असंख्य इमोशन्स.. अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.

एकदा संपलं की संपलं..; झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेनं निरोप घेतल्यानंतर अभिनेता भावूक
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 17, 2025 | 8:34 AM
Share

छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यापैकी काही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरतात. त्यातील कलाकारांना भरभरून लोकप्रियता मिळते. मात्र तरीही काही कारणास्तव मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतो. झी मराठी वाहिनीवरील अशीच एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय. त्यानिमित्त या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. मालिकेच्या  सेटवरील अनेक आठवणीसुद्धा त्याने फोटोच्या रुपात शेअर केल्या आहेत. ही मालिका दुसरी तिसरी कोणती नसून ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही आहे. ऑगस्ट 2022 मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अल्पावधीतच या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मात्र आता हीच मालिका बंद होत आहे. या मालिकेत अर्जुनची भूमिका साकारणारा अभिनेता रोहित परशुरामने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे.

रोहित परशुरामची पोस्ट-

‘पावणेतीन वर्ष.. 850 एपिसोड्स.. 2000 पेक्षा जास्त सीन्स.. असंख्य इमोशन्स (भावना).. अगणित चांगल्या आठवणी.. एक आसगाव आणि एक अर्जुन वर्षा विनायक कदम.. प्रवास थांबला. एकदा संपलं की संपलं.. ते परत नाही येत,’ अशी भावूक पोस्ट त्याने लिहिली आहे. रोहितच्या या पोस्टवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘आसगाव आणि अर्जुन वर्षा विनायक कदम खूप भारी समीकरण आहे. तुम्ही सर्व कलाकारांनी खूप छान काम केलं,’ असं एकाने लिहिलं. तर ‘प्रेक्षकांचं प्रेम हेच तुमच्या कामाची पोचपावती,’ असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘मालिकेचा प्रवास थांबला तरी प्रेक्षकांच्या मनात तुम्ही नेहमीच डॅशिंग अर्जुन म्हणून राहाल’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.

‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत शिवानी नाईक, संतोष पाटील, रोहित परशुराम, ऋषभ कोंडवार, नीलम वाडेकर, सुनिल डोंगर, सुनिल शेट्ये यांच्या भूमिका होत्या. अप्पी आणि अर्जुनच्या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. तर चिमुकल्या अमोलचीही भूमिका प्रेक्षकांना खूप भावली होती. या मालिकेनं जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी त्याजागी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.