AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर’ चित्रपटाचा रेकॉर्ड धोक्यात? प्रभासच्या ‘द राजा साब’ पहिल्याच दिवशी मोडले ‘या’ 5 चित्रपटांचे रेकॉर्ड

प्रभासचा हॉरर चित्रपट 'द राजा साब' प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 5 मोठ्या चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे.

'धुरंधर' चित्रपटाचा रेकॉर्ड धोक्यात? प्रभासच्या 'द राजा साब' पहिल्याच दिवशी मोडले 'या' 5 चित्रपटांचे रेकॉर्ड
| Updated on: Jan 09, 2026 | 6:50 PM
Share

The Raja Saab Box Office Collection Day 1: साऊथ सुपरस्टार प्रभासचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘द राजा साब’ 9 जानेवारी 2026 रोजी अखेर थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला असून, रिलीज होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होताच या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अनेक चित्रपटांचे ओपनिंग कलेक्शनला मागे टाकले आहे.

‘द राजा साब’ने रिलीजपूर्वीच अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधींची कमाई केली होती. आता थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतरही या चित्रपटाने जोरदार कमाई करताना दिसत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटाने संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 19.19 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवसातच इतकी मोठी कमाई करत प्रभासच्या या चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे.

पहिल्याच दिवशी या चित्रपटांना टाकलं मागे

‘द राजा साब’ने धनुष आणि कृति सेनन यांच्या ‘तेरे इश्क में’ या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईला मागे टाकले आहे. ‘तेरे इश्क में’ने पहिल्या दिवशी 16 कोटी रुपयांची कमाई केली होती. याशिवाय प्रभासच्या चित्रपटाने ‘स्काय फोर्स’ 12.25 कोटी, ‘जॉली एलएलबी 3’ 12.5 कोटी, ‘सितारे जमीन पर’ 10.7 कोटी, ‘जाट’ 9.5 कोटी अशा चित्रपटांच्या ओपनिंग डे कलेक्शनवरही मात केली आहे.

‘द राजा साब’ हा एक हॉरर चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन मारुती यांनी केले आहे. या चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत झळकत असून त्यांच्यासोबत संजय दत्त एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटात अभिनेत्री मालविका मोहनन, रिद्धी कुमार आणि निधी अग्रवाल यांच्या भूमिका आहेत. तसेच झरीना वहाब आणि बोमन इराणी यांचाही चित्रपटात समावेश आहे.

प्रभासचा आगामी चित्रपट

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास ‘द राजा साब’नंतर प्रभासकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. तो लवकरच ‘स्पिरिट’ या चित्रपटात दिसणार असून यात त्याच्यासोबत तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा करत आहेत. याशिवाय प्रभासकडे ‘सालार पार्ट 2’ आणि ‘कल्की 2898 एडी पार्ट 2’ हे बहुचर्चित चित्रपटही आहेत.

त्यामुळे पहिल्याच दिवशी मिळालेल्या तगड्या प्रतिसादामुळे ‘द राजा साब’ पुढील काही दिवसांमध्ये आणखी काही चित्रपटांचे रेकॉर्ड्स मोडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार