AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

12 ज्योतिर्लिंग दर्शनाचा संकल्प, देवीला गाऱ्हाणं, गुरुपूजा कोर्स.. प्राजक्ता माळीला अध्यात्माची ओढ

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रिय असते. गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ताचे पोस्ट पाहता ती अध्यात्माच्या मार्गात चांगलीच रमल्याचं दिसून येत आहे. तिने 12 ज्योतिर्लिंगाच्या यात्रेचाही संकल्प केला आहे.

12 ज्योतिर्लिंग दर्शनाचा संकल्प, देवीला गाऱ्हाणं, गुरुपूजा कोर्स.. प्राजक्ता माळीला अध्यात्माची ओढ
Prajakta MaliImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 31, 2023 | 10:40 AM
Share

मुंबई : 31 ऑक्टोबर 2023 | अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतेच. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांसोबतच्या भेटीगाठी वाढल्याने ती चर्चेत होती. दसऱ्यानिमित्त ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमातसुद्धा सहभागी झाली होती. आता अध्यात्माच्या मार्गावरील प्राजक्ताच्या प्रवासाची चर्चा रंगतेय. त्यामागचं कारणंही तसंच आहे. तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिल्यानंतर तुम्हालाही ही गोष्ट सहज दिसून येईल. नवरात्रौत्सवात प्राजक्ता अंबेजोगाईला योगेश्वरी देवीचं दर्शन घेण्यासाठी गेली होती. ‘अंबे तुज वाचून कोण पुरवील आशा..’ असं कॅप्शन देत तिने खास फोटो पोस्ट केले होते. फक्त एवढंच नाही, तर तिने देवदर्शनाचा मोठा संकल्पसुद्धा केला आहे.

प्राजक्ता माळीने येत्या वर्षात 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा करण्याचा संकल्प घेतला आहे. 23 ऑक्टोबरपासून तिने या संकल्पाची सुरुवात महाराष्ट्रातील परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन केली. ‘आजच्या सोमवारी संकल्प सोडला. येत्या वर्षात 12 ज्योतिर्लिंग यात्रा करणार. आज सुरुवात झाली- महाराष्ट्रातल्या परळी वैजनाथपासून. ही यात्रा एकसंधपणे करता आली असती तर जास्त आनंद झाला असता. पण कामाच्या कमिटमेंट्समध्ये ते शक्य नाही. आपणांस तसं जमत असेल तर जरुर करावं’, असं कॅप्शन देत तिने ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे फोटो पोस्ट केले होते.

12 ज्योतिर्लिंग यात्रेचा संकल्प केल्यानंतर प्राजक्ता इथेच थांबली नाही. तर तिने श्री श्री रविशंकर यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ फाऊंडेशनचा गुरुपूजा कोर्सदेखील नुकताच पूर्ण केला आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या बेंगळुरूमधील आश्रमात जाऊन तिने हा कोर्स केला. यामध्ये तब्बल 22 देश आणि सबंध भारतातून 630 जण सहभागी झाले होते. ‘मी आता स्वत:ला गुरुपूजा पंडित म्हणू शकते का? काल बँगलोर आश्रमात आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनचा गुरूपूजा कोर्स पूर्ण केला. या कोर्सला किती महत्त्व आहे ते आर्ट ऑफ लिव्हिंग कुटुंब समजू शकेल’, असं लिहित तिने आश्रमाबाहेरील फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी प्राजक्ताचं कौतुक केलं आहे.

...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.