AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाऊ कसाही असू दे… रील स्टार प्रथमेश कदमच्या निधनापूर्वी बहिणीची पोस्ट, पाहून तुमचेही डोळे पाणावतील

लोकप्रिय मराठी रील स्टार प्रथमेश कदम याचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्याच्या निधनानंतर बहीण प्रतिक्षा कदम हिची जुनी पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांचे डोळे पाणावले आहेत.

भाऊ कसाही असू दे... रील स्टार प्रथमेश कदमच्या निधनापूर्वी बहिणीची पोस्ट, पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Prathmesh Kadam Death
| Updated on: Jan 26, 2026 | 3:19 PM
Share

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा तरुण आणि लोकप्रिय रील स्टार प्रथमेश कदम याचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून तो रुग्णालयात उपचार घेत होता. मात्र त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. प्रथमेशच्या जाण्याने मराठी सोशल मीडिया विश्वावर शोककळा पसरली आहे. तसेच एका उमद्या कलाकाराला गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यातच आता प्रथमेशच्या बहिणीची एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

प्रथमेश कदम हा इन्स्टाग्रामवर त्याच्या आईसोबतच्या मजेशीर आणि कौटुंबिक रील्ससाठी ओळखला जायचा. मायलेकाचं प्रेम, त्यांच्यातील गोड संवाद आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील साधेपणा यांमुळे तो सोशल मीडियावर फारच प्रसिद्ध होता. प्रथमेशच्या या कंटेटमुळे तो लोकप्रिय झाला होता. अनेकदा तो आपल्या व्हिडीओमधून आईच्या कष्टाचे आणि त्यांच्या नात्याचे महत्त्व सांगत असे. याच कारणामुळे त्याची फॅन फॉलोइंग मोठ्या प्रमाणावर वाढली होती.

कॅप्शनने सर्वांचेच डोळे पाणावले

प्रथमेशच्या पश्चात त्याची आई प्रज्ञा कदम आणि बहीण प्रतिक्षा कदम असा परिवार आहे. विशेष म्हणजे, प्रथमेशच्या निधनाच्या अवघ्या १५ दिवसांपूर्वी त्याची बहीण प्रतिक्षा हिने इंस्टाग्रामवर एक रील शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने एका टेडी-बिअरसोबत रील केला होता. या रीलला तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच डोळे पाणावले आहेत.

“भाऊ कसाही असू दे, पण बहिणीच्या काळजाचा तुकडा असतो तो…”, असे कॅप्शन तिने रिलला दिले होते. यासोबतच तिने इतर बहिणींना आपल्या भावाला टॅग करण्याचे आवाहन केले होते. या व्हिडीओला तिने एका मराठी चित्रपटातील खारी हे गाणे बॅकग्राऊंडला लावले होते. ज्यामुळे प्रथमेशच्या चाहते त्याच्या आठवणीत अधिकच भावूक झाले आहेत.

तन्मय पाटेकरने दिली माहिती

दरम्यान डिसेंबर महिन्यात प्रथमेशने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपण आजारी असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. त्याने लवकरच बरा होऊन परत येण्याचा विश्वासही व्यक्त केला होता. मात्र आज त्याचा जवळचा मित्र तन्मय पाटेकरने सोशल मीडियावर त्याच्या निधनाची एक अत्यंत भावूक पोस्ट लिहून प्रथमेशला श्रद्धांजली वाहिली आहे. आता सध्या सोशल मीडियावर अनेक जण त्याचे जुने व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. तसेच या व्हिडीओद्वारे ते प्रथमेशला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.