AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मॅक्सवेलने तुझ्याशी लग्न केलं नाही का?’ चाहत्याने असा प्रश्न विचारताच प्रीती झिंटा भडकली अन्….

अभिनेत्री प्रीती झिंटाला एका चाहत्याने मॅक्सवेल आणि तिच्या लग्नाबाबतचा असा काही प्रश्न विचारला की, प्रीती भडकली अन् तिने त्या चाहत्याला थेट सुनावलं आहे. म्हणाली, " मला योग्य तो आदर...."

'मॅक्सवेलने तुझ्याशी लग्न केलं नाही का?' चाहत्याने असा प्रश्न विचारताच प्रीती झिंटा भडकली अन्....
Preity ZintaImage Credit source: Instagram
| Updated on: May 13, 2025 | 9:03 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आयपीएल टीम पंजाब किंग्जची मालकीण आहे. आयपीएल 2025 दरम्यान ती वारंवार स्टेडियममध्ये दिसत होती. त्याच वेळी,अभिनेत्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर खूप सक्रिय देखील होती. प्रीती अनेकदा PZchat वापरते. एका चाहत्याने तिला सोशल मीडियावर एक प्रश्न विचारला ज्यानंतर ती प्रचंड संतापलेली दिसली.. प्रीती झिंटाने त्या चाहत्याला उत्तर देत चांगलंच फटकारलं आहे.

‘तुम्ही हा प्रश्न सर्व पुरुष टीमला विचाराल का?

पीझेडचॅट सत्रादरम्यान, एका चाहत्याने प्रीती झिंटाला विचारलं ‘मॅडम, मॅक्सवेलचे तुमच्याशी लग्न झाले नाहीये का? म्हणूनच तो तुमच्या संघात चांगला खेळला नाही?’ चाहत्याच्या या प्रश्नावर अभिनेत्री संतापली. त्यावर तिने उत्तर देत म्हटलं की, ‘तुम्ही हा प्रश्न सर्व पुरुष टीमला विचाराल का? की हा भेदभाव फक्त महिलांसाठीच आहे?’ मी क्रिकेटमध्ये येईपर्यंत मला कधीच माहित नव्हते की महिलांसाठी कॉर्पोरेट सेटअपमध्ये टिकून राहणे किती कठीण आहे.”

‘मला जो आदर मिळायला हवा तो द्या’ प्रीती झिंटाने पुढे लिहिले – ‘मला खात्री आहे की तुम्ही हा प्रश्न विनोदाने विचारला असेल, पण मला आशा आहे की तुम्ही तुमच्या प्रश्नाकडे खरोखर पहाल आणि तुम्ही काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहात ते समजू शकाल कारण जर तुम्हाला खरोखरच समजले असेल की तुम्ही जे काही म्हणण्याचा प्रयत्न करत आहात ते चांगलं नाहीये. मला वाटतं की मी गेल्या 18 वर्षात माझी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, म्हणून कृपया मला माझा योग्य आदर द्या आणि लिंगभेद थांबवा. धन्यवाद.” असं म्हणत तिने त्या चाहत्याला चांगलंच सुनावलं.

चाहत्यांनी प्रीतीला पाठिंबा दिला . प्रीती झिंटाने चाहत्याला ज्या पद्धतीने उत्तर दिले त्याचे इतर सोशल मीडिया वापरकर्ते कौतुक करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले- ‘प्रीती मॅडम, या प्रतिसादासाठी तुम्हाला सलाम. पंजाब किंग्जसोबत तुम्ही खूप चांगले काम केले आहे आणि किमान कोणीतरी तुम्हाला तो आदर देऊ शकेल जो तुम्ही पात्र आहात. लोक अशा घाणेरड्या कमेंट्स करत राहतात, हे आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणे आहे. खंबीर राहा आणि पुढे जात राहा मॅडम”. तर दुसऱ्या व्यक्तीने कमेंट केली आहे की, ‘मॅडम, अशा लोकांकडे दुर्लक्ष करा, ते त्यांच्या आयुष्यात काहीही करू शकत नाहीत.’ कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, प्रीती झिंटा आता ‘लाहोर 1947’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सनी देओलही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं.
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका.
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.