AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुरुषांना खूप त्रास होतो जेव्हा अभिनेत्रींना..; प्रिती झिंटाचं उत्तर ऐकून अभिनेत्याची बोलतीच बंद!

नुकत्याच दिलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री प्रिती झिंटाने सर्वांसमोर कपिल शर्माला सुनावलं. पुरुषांमध्ये महिलांपेक्षा अधिक सहनशीलता असते, अशी टिप्पणी करणाऱ्या कपिलला प्रितीने तिच्याच अंदाजात उत्तर दिलं.

पुरुषांना खूप त्रास होतो जेव्हा अभिनेत्रींना..; प्रिती झिंटाचं उत्तर ऐकून अभिनेत्याची बोलतीच बंद!
प्रिती झिंटाImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 30, 2026 | 11:43 AM
Share

कॉमेडियन कपिल शर्माने नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यात महिला आणि पुरुषांच्या सहनशक्तीची तुलना केली, तेव्हा अभिनेत्री प्रिती झिंटाने तिच्याच अंदाजात उत्तर दिलं. कपिलने निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, प्रिती झिंटा, सोनाक्षी सिन्हा, शिल्पा शेट्टी आणि फराह खान यांना मंचावर बोलावलं होतं. यावेळी कपिलने मजेशीरपणे महिलांच्या सहनशीलतेवर टिप्पणी केली. त्यावर प्रितीने त्याला असं उत्तर दिलं, ज्यामुळे कपिलची बोलतीच बंद झाली. प्रितीचं हे उत्तर आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कपिलने सर्वांत आधी करण जोहरच्या हातात झाडू दिला, तेव्हा “मला हे अजिबात आवडलं नाही” असं त्याने म्हटलंय. तेव्हा कपिल त्याला म्हणतो, “पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा अधिक सहनशीलता असते. तुम्हाला तपासून पाहायचं असेल तर कोणत्याही स्त्रीला ‘आंटी’ म्हणून दाखवा. पुढच्या दोन मिनिटांत तिचा चेहरा रागाने लाल होईल.” नंतर कपिलचं आव्हान स्वीकारून प्रिती झिंटा, शिल्पा शेट्टी आणि फराह खान हातात झाडू घेऊन मंचावर येतात. त्यांना पाहताच कपिल घाबरून म्हणतो, “सर्वत्र मुलींचं राज्य असतं.”

यावेळी प्रिती झिंटा मात्र कपिल शर्माच्या टिप्पणीकडे दुर्लक्ष करण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती थेट म्हणाली, “पुरुषांना खरंतर कोणत्याच वेदना जाणवत नाहीत. त्यांना फक्त तेव्हाच त्रास होतो जेव्हा एखाद्या अभिनेत्रीला त्यांच्यापेक्षा जास्त मानधन मिळतं. हीच खरी अडचण आहे.” प्रितीचं हे उत्तर ऐकून उपस्थित प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करतात. तिच्यानंतर सोनाक्षी सिन्हासुद्धा कपिलला उत्तर देते. “कपिल, तुझा गैरसमज दूर करून घे. बजरंगी भाईजान हा चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर या कारणामुळे यशस्वी ठरला, कारण त्यात बजरंगीसोबत मुन्नी होती”, असं ती म्हणते. पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

इंडस्ट्रीत अभिनेते आणि अभिनेत्रींना मिळणाऱ्या मानधनाबाबत अनेकदा चर्चा झाल्याचं पहायला मिळालं. भूमिका कितीही महत्त्वाची किंवा मोठी असली तरी अभिनेत्रींना तुलनेनं कमी मानधन मिळत असल्याची तक्रार अनेकांनी केली. याबाबत प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय यांसारख्या मोठ्या अभिनेत्रींनी आपली स्पष्ट मतं मांडली होती.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा