AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्राइवेट व्हिडीओ व्हायरल होताच ही अभिनेत्री घाबरलेली, केलेला टीकेचा सामना, लवकरच होणार आई

प्राइवेट व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रसिद्ध अभिनेत्रीची झालेली प्रचंड बदनामी. सोशल मीडियावर उडालेली खळबळ. आता तिच अभिनेत्री लग्नाच्या 10 वर्षानंतर होतेय आई. कोण आहे ती अभिनेत्री?

प्राइवेट व्हिडीओ व्हायरल होताच ही अभिनेत्री घाबरलेली, केलेला टीकेचा सामना, लवकरच होणार आई
Image Credit source: Social media
| Updated on: May 02, 2026 | 2:38 PM
Share

बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्या कधी ना कधी वैयक्तिक आयुष्यातील वादांमुळे चर्चेत आल्या आहेत. अशाच एका घटनेमुळे एकेकाळी भोजपुरी सिनेमाची लोकप्रिय अभिनेत्री संभावना सेठ मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. तिचा एक खाजगी व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्या काळात मोठी खळबळ उडाली होती.

काही वर्षांपूर्वी संभावना सेठ हिचा एक प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाला होता. या घटनेमुळे तिची मोठ्या प्रमाणावर बदनामी झाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ती पूर्णपणे हादरून गेली होती. हा व्हिडिओ लोकांपर्यंत कसा पोहोचला याचा तिलाही अंदाज येत नव्हता. या प्रकरणानंतर संभावना सेठने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत एफआयआर दाखल केली होती. या घटनेने तिच्या मानसिक स्थितीवरही परिणाम झाला होता. भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये काम करताना अशा गोष्टींचा सामना करावा लागू शकतो अशीही भावना तिने व्यक्त केली होती.

अभिनेत्रीने दिली चाहत्यांना आनंदाची बातमी

आजही काही लोक या जुन्या घटनेचा उल्लेख करताना दिसतात आणि सोशल मीडियावर तिच्याबद्दल शोध घेतात. मात्र, या सर्व वादांनंतरही संभावना सेठने स्वतःला सावरत आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, अलीकडेच संभावना सेठने आपल्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. ती लवकरच आई होणार असल्याचे तिने जाहीर केले आहे. ही बातमी समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संभावना सेठने आई होण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. आयव्हीएफ प्रक्रियेद्वारे तिने सात वेळा प्रयत्न केले, मात्र त्यात यश आले नव्हते. या काळात तिला समाजाकडून अनेक टोमणेही सहन करावे लागले. काही लोकांनी तिला अपमानास्पद शब्दांत हिणवले, ज्याचा तिच्यावर खोल परिणाम झाला होता.

लग्नानंतर तब्बल 10 वर्षांनी संभावना सेठने ही आनंदाची बातमी दिली आहे. मात्र, यावेळी ती स्वतः बाळाला जन्म देणार नसून दुसऱ्या पर्यायाचा अवलंब करत आई होण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. सर्व अडचणींवर मात करत संभावना सेठने नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा घेतलेला हा निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Follow Us
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
kalyan | कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव... मुख्यमंत्र्यांनी सूत्रसंचालकाला मध्येच अडवलं अन्...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा घराबाहेर गराडा; पुण्यातील राजकीय हालचालींना वेग
परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला
Parbhani| परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला, अनेकजण जखमी
शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
Amit Shah | शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम...
Omraje Nimbalkar | शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम निर्णय घेणार!
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी... राजकारणातील घडामोडींना वेग
हे सगळं पैशासाठी असेल तर...; पवनराजे निकालावर अंजली दमानियांचा संताप
Anjali Damania | हे सगळं पैशासाठी असेल तर...; पवनराजे निकालावर अंजली दमानियांचा संताप अनावर
एकही खासदार कुठंही जाणार नाही, कारण... शिंदे सेनेतील नेत्याने सांगितलं
Big Breaking | एकही खासदार कुठंही जाणार नाही, कारण... शिंदे सेनेतील नेत्याने सांगितलं गुपित