AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘काजळमाया’ मालिकेत प्रिया बेर्डेंची जबरदस्त भूमिका; प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता

'काजळमाया' या मालिकेत अभिनेत्री प्रिया बेर्डे अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. यानिमित्ताने त्या दहा वर्षांनंतर स्टार प्रवाह वाहिनीवर पुनरागमन करत आहेत. त्यांच्या या भूमिकेवरून नुकताच पडदा उचलण्यात आला आहे.

'काजळमाया' मालिकेत प्रिया बेर्डेंची जबरदस्त भूमिका; प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता
Priya BerdeImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 15, 2025 | 9:02 AM
Share

आपल्या दमदार अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना प्रेक्षकांनी अनेक कलाकृतींच्या माध्यमातून पाहिलंय. प्रिया बेर्डे यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांना एक नवी अनुभूती मिळाली आहे. आता स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘काजळमाया’ या मालिकेतून कनकदत्ताच्या रुपात त्या पुन्हा एकदा मालिका विश्व गाजवण्यासाठी सज्ज आहेत. चेटकीण वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या आणि तंत्रविद्येत प्रविण असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकीणीची गोष्ट म्हणजेच काजळमाया ही मालिका.

रुपाने सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी, निर्दयी आणि संधीसाधू आहे. चेटकीण वंश वाढवण्याचं एकमेव ध्येय तिच्या डोळ्यांसमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. कनकदत्ता ही पर्णिकाची आई. सुडाच्या भावनेने पेटलेली, अत्यंत खुनशी आणि मोठे डोळे आणि आपल्या चेटकीण मुलीबद्दल अभिमान बाळगणारी. आपल्या मुलीने म्हणजेच पर्णिकाने चेटकीण वंश पुढे वाढवावा एवढीच कनकदत्ताची इच्छा आहे. याच हेतूने ती पर्णिकाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेला खत पाणी घालते. कनकदत्ता आणि पर्णिका आपलं ध्येय पूर्ण करण्यात यशस्वी ठरणार का याची उत्कंठावर्धक गोष्ट काजळमाया मालिकेतून पाहायला मिळेल.

कनकदत्ता या भूमिकेविषयी सांगताना प्रिया बेर्डे म्हणाल्या, “माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात अश्या पद्धतीची भूमिका मी कधीही साकारलेली नाही. कनकदत्ताला पाहताच क्षणी धडकी भरते. ती बेमालूमपणे वेषांतर करते. तिला संमोहन विद्या अवगत आहे. या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत. ही अनोखी भूमिका प्रेक्षकांना नक्की आवडेल याची मला खात्री आहे.” काजळमाया ही नवी गूढ मालिका येत्या 27 ऑक्टोबरपासून रात्री 10.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय केळकर आरुष वालावलकर हे पात्र साकारणार आहे. तर नवोदित अभिनेत्री रुची जाईल या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करतेय. “मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अभिनेत्री व्हायचं मी पाहिलेलं स्वप्न या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण होत आहे. काजळमाया मालिकेत मी विलक्षण सुंदर अशा चेटकीणीच्या रुपात दिसणार आहे. प्रोमो शूटच्या दिवशी जेव्हा मी स्वत:ला चेटकीणीच्या रुपात पाहिलं तेव्हा मी देखिल एका क्षणासाठी घाबरले. मालिकेचं कथानक जितकं गूढ आहे तितकच उत्कंठावर्धक आहे”, असं ती म्हणाली.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.