AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी शाहरुखच्या थोबाडीत मारलं अन् सेटवर शांतता पसरली’, अभिनेत्रीने सांगितला शुटींगचा किस्सा

एका अभिनेत्रीने मुलाखतीत शाहरुख खानसोबत तिचा घडलेला एक किस्सा सांगतला. शुटींगच्या वेळी तिने शाहरूख खानला थोबाडीत मारली होती. या गोष्टीचा आजही तिला पश्चाताप असल्याचं तिने म्हटलं आहे. कोण आहे ती अभिनेत्री आणि का तिने शाहरूखच्या कानशिलात लगावली होती.

'मी शाहरुखच्या थोबाडीत मारलं अन् सेटवर शांतता पसरली', अभिनेत्रीने सांगितला शुटींगचा किस्सा
priya gillImage Credit source: instagram
| Updated on: May 31, 2025 | 2:23 PM
Share

बॉलिवूमध्ये चित्रपटांच्या शूटवेळी अशा अनेक घटना घडतात ज्याची कल्पना चाहत्यांना नसते. मग एखाद्या मुलाखतीत जेव्हा एखादा कलाकार त्या घटनांबद्दल सांगतो तेव्हा मग ते किस्से सर्वांसमोर येतात. असाच एक किस्सा एका अभिनेत्रीने सांगितला आहे. हा किस्सा तिचा बॉलिवूड बादशाह शाहरूख खानसोबत घडला होता. एका चित्रपटाच्या शुटींग दरम्यान या अभिनेत्रीने शाहरूखच्या कानशिलात लगावली अन् अख्ख्या सेटवर शांतता पसरली होती. खंरतर ही अभिनेत्री त्या प्रसंगामुळे आजही तेवढीच स्वत:ला कोसत आहे.

अभिनेत्रीने शाहरूखच्या कानशिलात लगावली

ही अभिनेत्री म्हणजे प्रिया गिल. प्रियाने एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. तिची आणि शाहरूख खानची जोडी ‘जोश’ चित्रपटात आहे. त्यांची केमिस्ट्रीही लोकांना आवडली होती. पण चित्रपटाच्या शुटींग दरम्यान एक किस्सा असा घडला होता की प्रियाने शाहरूखच्या कानशिलात लगावली होती.

2000 साली प्रदर्शित झालेल्या शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांच्या ‘जोश’ या चित्रपटाने लोकांची मने जिंकली. चित्रपटातील एका दृश्यात प्रियाने शाहरुख खानला कानशिलात मारली आहे. हे दृश्य चित्रित करणे तिच्यासाठी एक समस्या बनली होती. जर तुम्ही ‘जोश’ चित्रपट पाहिला असेल, तर तुम्हाला तो सीन आठवेल जेव्हा चित्रपटातील एका गाण्यात प्रिया शाहरुख खानला थप्पड मारते. एका मुलाखतीत अभिनेत्रीने शाहरुखसोबत काम करण्याचा तिचा अनुभव शेअर केला आणि थप्पड मारण्याच्या सीनला तिने तिच्या कारकिर्दीतील सर्वात लाजिरवाणा क्षण म्हटलं.

‘ते मी कधीही विसरणार नाही….’

प्रिया म्हणाली, ‘माझ्या संपूर्ण चित्रपट कारकिर्दीतील सर्वात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे मी शाहरुखला थप्पड मारली. गाण्याच्या सुरुवातीलाच मला त्याला थप्पड मारावी लागली. आम्ही गोव्यात ही सीन शूट करत होतो. हा सीन मला पुन्हा पुन्हा करावा लागत होता कारण मन्सूर मला सांगत होता, ‘प्रिया, हा टेक जसा यायला हवं होतं नाहीये, यामध्ये ती मुलगी त्याच्यावर रागावलेली हे दिसायला हवं. आणि मी ‘हो, ठीक आहे’ असं म्हणत होतं आणि प्रयत्न करत राहिले. शेवटी शाहरुख मला म्हणाला, ‘तू मला मार….’ आणि त्यामुळे त्या सीनसाठी मला त्याला जोरात मारावं लागलं. मी हे होण्यापासून थांबवू शकले नाही. खरं सांगायचं तर, मी ते कधीही विसरणार नाही.” असं म्हणत प्रियाने आजही त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

‘मी त्याला थप्पड मारली तेव्हा सेटवर पूर्ण शांतता होती.’

ती पुढे म्हणाली ‘मी त्याला थप्पड मारली तेव्हा सेटवर पूर्ण शांतता होती. सगळेजण फक्त… कॅमेरा फिरवत राहिले. मला वाटतं दिग्दर्शक कट म्हणायला विसरला कारण प्रतिक्रिया खूपच जबरदस्त होती. मला आठवतंय की कॅमेरामन केवी मला म्हणाला होता, ‘तू शाहरुखला मारलंस आता मुली तुझा तिरस्कार करतील.’ पण तो मला हा सीन योग्य कसा करायचा ते समजावून सांगत होता. आणि मला काय बोलावं ते कळत नव्हते. त्यानंतर, लगेच गाणे सुरू होते. तर कल्पना करा की मी किती तणावात असेल तेव्हा आणि शाहरूख किती सहजपणे सगळा अभिनय करत होता”

प्रिया गिलने असेही म्हटलं की ती शाहरुख खानची खूप मोठी चाहती आहे आणि त्याच्यासोबत काम करणे तिच्यासाठी स्वप्नासारखे होते. तिने सांगितले की तिला कधी त्याच्यासोबत काम करायला मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. तर असा हा प्रसंग सांगत प्रियाने ती आजही त्या सीनमुळे पश्चाताप करत असल्यांचं म्हणते.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.