कोण आहे प्रियांका चोप्राची होणारी वहिनी? भाऊ सिद्धार्थचा रोका, आधी मोडलं होतं लग्न

अभिनेत्री प्रियांचा चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राचा रोका नुकताच पार पडला. दाक्षिणात्य अभिनेत्री नीलम उपाध्यायशी सिद्धार्थने रोका केला आहे. यावेळी प्रियांका आणि तिचा पती निक जोनाससुद्धा उपस्थित होते.

कोण आहे प्रियांका चोप्राची होणारी वहिनी? भाऊ सिद्धार्थचा रोका, आधी मोडलं होतं लग्न
निक जोनास, प्रियांका चोप्रा, सिद्धार्थ चोप्रा आणि नीलम उपाध्यायImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 8:30 AM

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या घरी लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत. कारण तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतीच प्रियांका आणि तिचा पती निक जोनास हे पारंपरिक पोशाखात कुठेतरी एकत्र जाताना दिसले. यावेळी प्रियांकाची आई मधू चोप्रासुद्धा उपस्थित होती. हे सर्वजण सिद्धार्थच्या रोका समारंभासाठी गेले होते. त्याचेच फोटो आता सोशल मीडियावर समोर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रियांका आणि निक भारतात आहेत. इतर काही ठरलेल्या कार्यक्रमांसोबतच भावाच्या रोकाला उपस्थित राहण्यासाठी ती भारतात आल्याचं समजतंय.

सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर होणाऱ्या पत्नीसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. गर्लफ्रेंड नीलम उपाध्यायसोबत सिद्धार्थचा रोका पार पडला आहे. आता नीलम ही प्रियांकाची वहिनी होणार आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या रोकाचे फोटो व्हायरल होत आहेत. सिद्धार्थचा याआधी इशिता कुमारशी साखरपुडा झाला होता. 2019 मध्ये या दोघांनी साखरपुडा केला होता. त्यावेळी प्रियांकासुद्धा रोका समारंभाला उपस्थित होती. एप्रिल 2019 च्या शेवटच्या आठवड्यात ते लग्न करणार होते. मात्र लग्नापूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला. नंतर 2021 मध्ये इशिताने दुसऱ्याशी लग्न केलं.

हे सुद्धा वाचा

कोण आहे प्रियांका चोप्राची होणारी वहिनी?

सिद्धार्थची होणारी पत्नी आणि प्रियांकाची होणारी वहिनी नीलम उपाध्याय ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने 2012 मध्ये ‘मिस्टर 7’ या तेलुगू चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. तिने तमिळ भाषेतील चित्रपटांमध्येही काम केलंय. गेल्या नऊ वर्षांपासून ती टॉलिवूडमध्ये काम करतेय. 2018 मध्ये तिचा ‘तमाशा’ हा तेलुगू चित्रपट प्रदर्शित झाला होता.

भावाच्या रोकानंतर प्रियांकाने सोशल मीडियावर त्यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. ‘सिद्धार्थ आणि नीलम.. तुम्हा दोघांना खूप सारं प्रेम आणि आशीर्वाद. रोका झाल्याबद्दल दोघांनाही शुभेच्छा’, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत. यासोबतच प्रियांकाने एक फोटोसुद्धा पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिचा पती निक जोनास, ती, भाऊ सिद्धार्थ आणि नीलम हे चौघं एकत्र आहेत.

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.