Nick Jonas | प्रियंकाचे टेन्शन वाढले, निक जोनास रुग्णालयात दाखल, वाचा नेमकं काय झालं?

Nick Jonas | प्रियंकाचे टेन्शन वाढले, निक जोनास रुग्णालयात दाखल, वाचा नेमकं काय झालं?
प्रियंका आणि निक जोनास

गायक-गीतकार आणि अभिनेता निक जोनास याला त्याच्या नवीन शोच्या सेटवर दुखापत झाली आहे. दुखापतीनंतर निकला 15 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला किती आणि कुठे दुखापत झाली, हे अद्याप समजू शकलेले नाही.

Harshada Bhirvandekar

|

May 17, 2021 | 3:01 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) हिने पॉप गायक निक जोनासशी (Nick Jonas) लग्न केले आहे. निक देखील आपली पत्नी प्रियंकाप्रमाणेच लोकप्रिय आहे आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. मात्र, आता निक जोनासच्या चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे. प्रियंका चोप्राचा पती निक जोनास याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे (Priyanka Chopra husband Nick Jonas Admitted in hospital).

भारतात प्रियंका चोप्रा इतकाच पती निक जोनासही खूप लोकप्रिय आहे. निकची गाणी भारतातही खूप प्रसिद्ध आहेत. भारतातील चाहते निकला ‘भावोजी’ असे संबोधित करतात, कारण तो ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा हिचा पती आहेत. अशा परिस्थितीत निकच्या दुखापतीची बातमी समोर आली आहे. या वृत्तामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

निक रुग्णालयात दाखल

बॉलिवूड हंगामाच्या बातमीनुसार, गायक-गीतकार आणि अभिनेता निक जोनास याला त्याच्या नवीन शोच्या सेटवर दुखापत झाली आहे. दुखापतीनंतर निकला 15 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला किती आणि कुठे दुखापत झाली, हे अद्याप समजू शकलेले नाही.

28 वर्षीय संगीतकार त्याच्या एका सिक्रेट प्रोजेक्टचे शुटिंग करत आहे आणि हा प्रकल्प आत्तापर्यंत पूर्णपणे सिक्रेट ठेवण्यात आला आहे. या गोंधळाच्या परिस्थितीत त्याला शनिवारी रात्री उशिरा रुग्णवाहिकेतून स्थानिक रूग्णालयात नेण्यात आले. परंतु, चाहते अद्याप अधिक माहितीच्या प्रतीक्षेत आहेत. असे म्हटले जात आहे की, काही काळानंतर निक जोनास घरी परतला आहे. कारण तो सोमवारी ‘द वॉईस’च्या नाईट एपिसोडमध्ये दिसणार आहे (Priyanka Chopra husband Nick Jonas Admitted in hospital).

निक जोनास याचा ‘स्पेसमॅन’ हा स्टुडिओ अल्बम नुकताच प्रसिद्ध झाला आहे. एक अभिनेता म्हणून तो ‘जुमानजी : वेलकम टू जंगल’, ‘मिडवे’ आणि ‘कॅओस वॉकिंग’मध्ये दिसला होता. 23 मे 2021रोजी निक बिलबोर्ड संगीत पुरस्कारांचे आयोजन करणार आहे.

प्रियंका चोप्राने बांधली लग्न गाठ

1 डिसेंबर 2018 रोजी प्रियंका आणि निकने हिंदू आणि ख्रिस्ती या दोन पद्धतींमध्ये विवाह केला. उदयपुरात अतिशय नेत्रदीपक सोहळ्यात या दोघांनी लग्न केले. त्यावेळी प्रियंकाचे लग्न खूप चर्चेत आले होते. दोघांच्या लग्नाचे फोटो चाहत्यांमध्ये अजूनही लोकप्रिय आहेत.

लोकांना मदत करण्यासाठी दोघेही पुढे आले!

प्रियांका आणि निक दोघांच्याही मदतीसाठी नेहमी पुढे असतात. आजकाल प्रियंका कोरोना संकटाला सामोरे जाणाऱ्यांना खूप मदत करत आहे. प्रियांका भलेही भारतापासून दूर असेल, पण तिने आपल्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून भारतासाठी काम सुरू ठेवले आहे.

(Priyanka Chopra husband Nick Jonas Admitted in hospital)

हेही वाचा :

Sherni : लवकरच ‘शेरनी’चा ग्लोबल प्रीमियर, विद्या बालन झळकणार मुख्य भूमिकेत

Miss Universe 2020 : तोतरेपणा, शरीरावर डाग, तरीही अ‍ॅडलिन कॅस्टेलिनो अशी पोहोचली ‘मिस युनिव्हर्स’पर्यंत

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें