Priyanka Chopra | ‘मेरी इज्जत का सवाल हैं’, दिग्दर्शकासमोर ढसा-ढसा रडली ‘देसी गर्ल’ कारण…

'त्या' घटनेनंतर प्रियांका चोप्रा हिला स्वतःचीच वाटू लागली लाज; दिग्दर्शकासमोर रडली, विनंती केली पण.., बॉलिवूडबद्दल अनेक गोष्टी समोर आणत आहे प्रियांका चोप्रा

Priyanka Chopra | 'मेरी इज्जत का सवाल हैं', दिग्दर्शकासमोर ढसा-ढसा रडली 'देसी गर्ल' कारण...
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 10:56 AM

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अभिनेत्रीने स्वतःला बॉलिवूडपर्यंत मर्यादित न ठेवता हॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवली. पण बॉलिवूड ते हॉलिवूड पर्यंतचा टप्पा गाठताना प्रियांकाला अनेक चढ – उतारांचा सामना करावा लागला. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये आलेले अनुभव अभिनेत्री चाहत्यांपर्यंत पोहोचवत आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना प्रियांका दिग्दर्शकांसमोर ढसा-ढसा रडली. शिवाय सिनेमात दिलेल्या इंटिमेट सीननंतर देखील घडलेल्या गोष्टी अभिनेत्रीने चाहत्यांना सांगितल्या. सध्या सर्वत्र प्रियांका चोप्रा आणि बॉलिवूडमध्ये अभिनेत्रीला आलेल्या अनुभवांची चर्चा रंगत आहे.

अभिनेते अनुपम खेर यांच्यासोबत एका टॉक शोमध्ये अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. यावेळी दिग्दर्शक राकेश रोशन यांनी कोणत्या आधारावर ‘क्रिश’ सिनेमात प्रियांकाला साईन केलं.. यावर अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. प्रियांका म्हणाली, ‘राकेश रोशन यांनी मला कोणाच्या तरी अंत्यसंस्कारादरम्यान पाहिलं होतं. त्यानंतर त्यांनी मला बोलावून घेतलं आणि म्हणाले, अंत्यसंस्कारादरम्यान मी तुला पाहिलं आहे. यावर मी म्हणाले, मी पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता, नो मेकअप लूक होता.. तरी देखील त्यांनी मला कास्ट केलं…’

priyanka chopra

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘कहो ना प्यार है सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी मला बोलावलं. ‘ऐतराज’ सिनेमातील माझं काम राकेश रोशन यांना पाहायचं होतं. पण सिनेमात माझे बोल्ड सीन असल्यामुळे मला भीती वाटत होती. अशात मी ‘ऐतराज’ सिनेमाचे दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांना फोन केला आणि त्यांना विनंती केली. माझ्या सन्मानाचा प्रश्न आहे. इंटरवल सीन राकेश रोशन यांना दाखवू नका…

‘सिनेमात एक बलात्काराचा सीन होता. ज्यामध्ये मी अभिनेता अक्षय कुमार साकारत असलेल्या भूमिकावर बलात्कार करताना सीन आहे. राकेश रोशन यांना तोच सीन पाहायचा होता. अखेर त्यांनी मला ‘क्रिश’ सिनेमात कास्ट केलं. तेव्हा मला स्वतःची लाज वाटत होती. शिवाय मी राकेश रोशल यांच्याकडे पाहू देखील शकत नव्हती..’ असं देखील अभिनेत्री प्रियांका चोप्रा म्हणाली.

प्रियांका चोप्राला ‘ऐतराज’मधील सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. अशी भूमिका साकाणारी ती काजोलनंतरची दुसरी अभिनेत्री ठरली. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुप्त: द हिडन ट्रुथ’ सिनेमासाठी काजोलला सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. सिनेमा अभिनेता बॉबी देओल देखील मुख्य भूमिकेत होता.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.