Instagram Rich List : इन्स्टाग्राम रीच लिस्टमध्ये प्रियंकाची बाजी, एका फोटोसाठी घेते इतके कोटी

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये धमाल करतेय. (Priyanka's bet in Instagram Rich List, takes so many crores for one post)

  • Updated On - 4:13 pm, Fri, 29 January 21
Instagram Rich List : इन्स्टाग्राम रीच लिस्टमध्ये प्रियंकाची बाजी, एका फोटोसाठी घेते इतके कोटी
प्रियंका चोप्रा : अभिनेत्री प्रियंका चोप्रानं बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठला आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 60.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, जे कोणत्याही भारतीय सेलिब्रिटींपेक्षा जास्त आहेत. त्याच्या आधी फक्त भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आहे ज्यानं अलीकडेच 100 कोटी फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये धमाल करतेय. आता प्रियंका अभिनयासोबतच व्यवसायातही पहिल्या क्रमांकावर आहे. इन्स्टाग्रामनं एक यादी शेअर केली आहे ज्यामध्ये कोणते कलाकार इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करण्यासाठी किती रुपये घेतात. या टॉप 100 लोकांमध्ये फक्त 2 भारतीयांचा समावेश आहे. ते म्हणजे प्रियंका चोप्रा आणि विराट कोहली. (Priyanka Chopra in Instagram Rich List)

मनोरंजन क्षेत्राबद्दल सांगायचं झालं तर या क्षेत्रातून प्रियंका चोप्रा ही एकमेव भारतीय अभिनेत्री आहे जिनं यात स्थान मिळवलंय. या यादीमध्ये प्रियंका 28व्या स्थानावर आहे. इन्स्टाग्रामवर तिचं 54 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. ती एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी 2.16 कोटी शुल्क आकारते.

या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं आपली जागा मिळवली आहे. तो एका इंस्टाग्राम पोस्टसाठी 2.21 कोटी शुल्क घेतो. या यादीमध्ये खेळाशी संबंधित एकूण 24 जणांनी आपलं स्थान निश्चित केलं आहे. यात फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोनं प्रथम क्रमांकावर आपलं स्थान निश्चित केलं आहे.

इन्स्टाग्राम रिच लिस्टमध्ये दाखवते की सेलिब्रेटी पोस्टसाठी किती शुल्क आकारतो. गेल्या वर्षी जाहीर झालेल्या यादीमध्ये भारतीय सेलेब्रिटींमध्ये प्रियांका चोप्रा आणि विराट कोहली यांचं नाव होतं. हे दोघंही इन्स्टाग्रामवर बर्‍यापैकी लोकप्रिय आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर प्रियंका चोप्राचा ‘द व्हाइट टायगर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रियांकाबरोबर राजकुमार राव देखील मुख्य भूमिकेत झळकलाय. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. यानंतर लवकरच प्रियंका अनेक हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. दुसरीकडे प्रियंकाचं अनफिनिश्ड पुस्तक 9 फेब्रुवारी रोजी प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात, तिनं आपल्या वैयक्तिक ते व्यावसायिक पसंतींबद्दल अनेक रहस्ये उघडली आहेत.

संबंधित बातम्या 

Pandu : झी स्टुडिओ प्रस्तुत ‘पांडू’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपटाच्या डिस्ट्रीब्युटर्सने रिलीजसाठी हैरान केलं होतं, RRR च्या प्रोड्युसरचा खुलासा

Published On - 4:13 pm, Fri, 29 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI