Pandu : झी स्टुडिओ प्रस्तुत ‘पांडू’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

झी स्टुडिओचा पांडू हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. (Zee Studio's 'Pandu' will hit the screens soon)

Pandu : झी स्टुडिओ प्रस्तुत ‘पांडू’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
VN

|

Jan 29, 2021 | 3:16 PM

मुंबई : कोरोना संकटामुळे 2020मध्ये चित्रपटगृह आणि नाट्यगृह पूर्णपणे बंद होती. त्यामुळे त्याचा परिणाम हा संपूर्ण हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीवर पडला. मात्र आता योग्य ती सावधगिरी बाळगून कोरोनाच्या नियमांचं पालन करत मालिका आणि सिनेमांच्या चित्रीकरणाचं काम सुरू झालं आहे. तसेच सिनेमागृह आणि नाट्यगृह हळूहळू सुरू करण्यात आली आहेत.

अशात आता मराठी सिनेसृष्टीतील सर्वात मोठ्या प्रॉडक्शन हाऊसनं कोरोनानंतरच्या पहिल्या सिनेमाची घोषणा केली आहे. झी स्टुडिओजचा पांडू हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे, लवकरच हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणारं आहे. या चित्रपटाला निर्माते दीपक पांडुरंग राणे यांनी त्यांच्या ट्विटरद्वारे शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

निर्माते दीपक राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”पांडू येतोय तुम्हाला खळखळून हसवायला. झी स्टुडीओजनं पांडू चित्रपटाची घोषणा करणं हे निर्माते, प्रेक्षकांसाठी खूप आशादायी आणि दिलासादायक गोष्ट आहे. या मोठ्या प्रॉडक्शन हाऊसेसने पुन्हा थिएटरकडे पाऊलं वळवली आहेत. ही खूप पॉझिटीव्ह गोष्ट आहे. आपली इंडस्ट्री 2021 गाजवायला सज्ज आहे.”

सर्वांनाच आशा आहे ती सिनेमांच्या हाऊसफुल्ल पाट्यांची. आता पांडू हा सिनेमा नवीन वर्षात नवं चैतन्य घेऊन येणारं यात शंका नाही.

संबंधित बातम्या

Dhanashri Kadgaonkar | ‘वहिनीसाहेबां’च्या घरी ‘युवराज’चे आगमन, सोशल मीडियावर शेअर केली आनंदाची बातमी!

Major : 26/11 चे हिरो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना महेश बाबूंचा सलाम, ‘मेजर’ चित्रपटाची तारीख जाहीर

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें