AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

123 मिनिटांचा सायको थ्रिलर सिनेमा, चकीत करणारा क्लायमॅक्स, प्रत्येक भूमिकेवर उपस्थित होईल शंका

वीकेंडला ओटीटी प्लॅटफॉर्मवर उत्तम सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट पहायचा असेल, तर आम्ही तुम्हाला एक उत्तम पर्याय सुचवतो. हा चित्रपट तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवतो आणि याचा क्लायमॅक्स पाहून तुम्ही चकीत व्हाल.

123 मिनिटांचा सायको थ्रिलर सिनेमा, चकीत करणारा क्लायमॅक्स, प्रत्येक भूमिकेवर उपस्थित होईल शंका
नेटफ्लिक्सवरील सिनेमाImage Credit source: Instagram
| Updated on: May 15, 2026 | 10:37 AM
Share

जर तुम्हाला उत्तम सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट पहायचा असेल आणि ओटीटीवर काहीतरी नवीन कंटेंट तुम्ही शोधत असाल तर 2 तास 3 मिनिटांचा हा चित्रपट ‘मस्ट वॉच’च्या यादीत आवर्जून समाविष्ट करा. रोमँटिक, हॉरर किंवा कॉमेडी याशिवाय जर तुम्हाला दुसरं काहीतरी वेगळं पहायची इच्छा असेल तरीही तुम्ही या सायको थ्रिलरची निवड करू शकता. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा 2021 मध्ये केरळमध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट मूळ तमिळ भाषेत असला तर ओटीटीवर तो विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे. या सायकोलॉजिकल क्राइम चित्रपटात गोमती शंकर मुख्य भूमिकेत आहे आणि त्याचं दिग्दर्शक मिथुनने केलं आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला अनेक चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येतात. परंतु त्यापैकी काही उत्तम चित्रपट आणि सीरिजच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात आणि ट्रेंडिग यादीत स्थान मिळवू शकतात. या लेखात आम्ही ज्या सायकोलॉजिकल क्राइम थ्रिलरबद्दल बोलत आहोत, त्याचं नाव ‘स्टीफन’ असं आहे. या चित्रपटाची कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत इतकी दमदार आहे की तुम्ही एकदा तो पाहायला सुरू केला तर पूर्ण चित्रपट संपल्याशिवाय जागेवरून उठू शकणार नाही. यामधील ट्विस्ट आणि सीन्स पाहून तुम्ही थक्क व्हाल. ‘स्टीफन’चा क्लायमॅक्स तर सर्वांत जबरदस्त आहे.

चित्रपटाची कथा

स्टीफन ही एका शांत मुलाची कथा आहे, ज्याच्या हास्यामागे बालपणीचे आघात दडलेले असतात. जेव्हा परिसरात एकापाठोपाठ एक खून होऊ लागतात, तेव्हा एक पोलीस अधिकारी आणि एक चिकित्सक मानसशास्त्रज्ञ स्टीफनला गुन्हेगार बनवणारे छुपे रहस्य उघड करण्याच्यासाठी त्याच्या भूतकाळाचा शोध घेतात. त्यांच्या या शोधात दडपलेल्या वेदना, खरी ओळक आणि दीर्घकाळ जपलेल्या रहस्यांचं एक जाळं उलगडतं, जे त्याच्या प्रत्येक निर्णयाशी निगडीत असतं. स्टीफनच्या अंध:कारमय भूतकाळात खोलवर शिरून हा चित्रपट एक अत्यंत अस्वस्थ करणारं जग समोर आणतो.

हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तमिळ, हिंदी, मल्याळम, तेलुगू आणि इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये तो ओटीटीवर उपलब्ध आहे. या चित्रपटात गोमती शंकरसोबतच मायकल थंगदुराई, स्मृती व्यंकट यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...