AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

20 वर्ष मोठ्या व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी आशा भोसलेंनी घर सोडलं तेव्हा…, अनेक वर्षांनंतर उषा मंगेशकरांनी सांगितला ‘त्या’ भेटीचा किस्सा

20 वर्ष मोठ्या व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी अशा भोसले यांनी सोडलेलं घर, लग्नानंतर त्यांच्यात झालेले मोठे बदल, अनेक वर्षांनंतर उषा मंगेशकरांनी सांगितला 'त्या' भेटीचा किस्सा... सांगायचं झालं तर आशा भोसले यांनी कुटुंबियांच्या विरोधात जात 20 वर्ष मोठ्या गणपतराव भोसले यांच्यासोबत लग्न केलेलं...

20 वर्ष मोठ्या व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी आशा भोसलेंनी घर सोडलं तेव्हा..., अनेक वर्षांनंतर उषा मंगेशकरांनी सांगितला 'त्या' भेटीचा किस्सा
| Updated on: Jul 05, 2026 | 10:34 AM
Share

भारताच्या लोकप्रिय गायिका आशा भोसले आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या असंख्य आठवणी चाहत्यांच्या मनात कायम आहेत, आशा भोसले यांनी फक्त गाण्यांना त्यांच्या आवज दिला नाही तर, गाण्यांच्या माध्यमातून अनेकांनी जगण्याची प्रेरणा दिली आणि 12 एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांच्या निधनाला 2 महिने झाले असताना, त्यांची बहीण उषा मंगेशकर यांनी आशा ताईंबद्दल एक किस्सा सांगितला आहे. उषा मंगेशकर म्हणाल्यानुसार,अनेक वर्ष त्यांची भेट देखील झाली नव्हती, कारण आशा ताईंनी कुटुंबियांच्या विरोधात जात लग्न केलं होतं… आशा भोसले यांनी लग्न केल्यानंतर जेव्हा पहिली भेट झाली, उषा यांनी काय पाहिलं… याबद्दल अनेक वर्षांनी सांगितलं आहे.

सांगायचं झालं तर, आशा भोसले यांनी फार कमी वयात गणपतराव भोसले यांच्यासोबत लग्न करण्यासाठी घर सोडलं होतं. तेव्हा आशा ताई फक्त 16 वर्षांच्या होत्या आणि गणपतराव त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे होते. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत उषा यांनी सांगितलं की, जेव्हा आशा यांनी भेटले तेव्हा त्या हेमंतच्या आई झालेल्या.

उषा मंगेशकर म्हणाल्या, ‘लग्नानंतर ही पहिलीच वेळ होती, जेव्हा मी आशा यांना पाहत होती, तेव्हा त्या हेमंतच्या आई झालेल्या. त्यांनी घर सोडलं तेव्हा त्या फक्त 15 – 16 वर्षांच्या होत्या. इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदा त्यांना पाहत होती आणि त्यांच्याकडे पाहतच राहिली… कारण आमच्या समोर ज्या आशा होत्या त्या फार वेगळ्या होत्या… लहानपणीच्या आशा आमच्या लक्षात होत्या..’

लहानपणी टॉमबॉय होत्या आशा भोसले..

उषा मंगेशकर म्हणाल्या, ‘एका छोट्याशा टॉमबॉयच्या रुपातील आशा आम्हाला माहिती आहेत. ज्या पँट – शर्ट घालायच्या… वेस्टकोट घालायच्या… फक्त सात – आठ वर्षांच्या, सायकल चालवत असताना सर्वत्र फिरायच्या, भांडणं करायच्या… मी त्यांना कायम असंच पाहिलं होतं… त्यामुळे लग्नानंतर आशामध्ये एवढा बदल होईल असा कधी विचार देखील केला नाही… कायम हसऱ्या, सर्वांची मस्करी करणाऱ्या… मागे लागणाऱ्या आणि कायम मारण्यासाठी तयार असण्याऱ्या आशा आम्हाला माहिती होत्या…’

आशा भोसले, उषा मंगेशकरांना ओरडल्या तेव्हा…

लग्नानंतर झालेल्या त्या पहिल्या भेटीबद्दल उषा म्हणाल्या, ‘त्यांना लग्नानंतर पहिल्यांदा पाहिल्यानंतर मी पाहातच राहिले… कपाळावर मोठी टिकली, केस बांधलेले, पांढरी साडी नेसलेली, हातात सोन्याच्या बांगड्या आणि मनगटावर घड्याळ… आशा ताईंनी माझ्याकडे पाहिलं आणि मला ओरडल्या, केसांकडे लक्ष नाही देत, नीट पीन लाव…’, त्या भेटीबद्दल सांगताना, उषा म्हणाल्या, आशा लग्नानंतर पूर्ण बदलेल्या… त्यांच्य बोलण्याची पद्धत देखील पूर्णपणे बदलली होती.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे