AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘प्यार किया तो डरना क्या’मधील काजोलसोबतची ही अभिनेत्री आठवतेय का? आता ओळखूही येईना, जगतेय असं जीवन

'प्यार किया तो डरना क्या' चित्रपटातील काजोल सोबतची ही अभिनेत्री आठवतेय का? कधीकाळी काजोलशी तुलना झालेल्या या अभिनेत्रीने बॉलिवूडनंतर दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले. मात्र नंतर तिने लग्नानंतर चित्रपटसृष्टी सोडली. आता ती प्रसिद्धीपासून दूर आहे. इतक्या वर्षात तिच्या झालेला बदल पाहून तिला ओळखणंही कठीण झालं आहे.

'प्यार किया तो डरना क्या'मधील काजोलसोबतची ही अभिनेत्री आठवतेय का? आता ओळखूही येईना, जगतेय असं जीवन
Pyaar Kiya To Darna Kya Actress Anjala ZhaveriImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 03, 2025 | 5:21 PM
Share

बॉलिवूडमधील 90 च्या दशकातील काही चित्रपट अजून आपल्या आठवणीत असतात अगदी स्टोरी आणि डायलॉगसह. असाच एक चित्रपट म्हणजे सलमान आणि काजोलचा ‘प्यार किया तो डरना क्या’ हा चित्रपट सर्वात संस्मरणीय चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन सत्तावीस वर्षे उलटून गेली आहेत, परंतु त्यातील पात्रे, तसेच यातील गाणी लोकांच्या आठवणीत आजही आहेत. सलमान आणि काजोलची जोडी देखील लोकांच्या पसंतीस उतरली होती. या व्यतिरिक्त, अरबाज खान आणि अंजली झवेरी ही जोडी देखील प्रेक्षकांना तेवढीच भावली होती.

अभिनेत्रीच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली 

या चित्रपटात अरबाज खानने विशाल ठाकूरची भूमिका केली होती, तर अंजली झवेरीने त्याची प्रेयसी उजालाची भूमिका केली होती. चित्रपटात तिला मर्यादित स्क्रीन टाइम असूनही, अंजलीने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. अंजलीने तिच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. तिने कमी स्क्रीन टाइममध्येही स्वत:ची छाप सोडली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी तिची तुलना काजोलशी करायला सुरुवात केली होती.

बॉलिवूडमध्ये प्रवेश कसा झाला?

अंजली झवेरीचा जन्म लंडनमध्ये एका अनिवासी भारतीय कुटुंबात झाला. तिच्या बॉलिवूड पदार्पणाचे श्रेय ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांना जाते, ज्यांनी तिला त्यांचा मुलगा अक्षय खन्ना सोबत “हिमालय पुत्र” या चित्रपटातून लाँच केले. हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार यश मिळवलं नसलं तरी अंजलीच्या साधेपणा आणि आकर्षक लूकने प्रेक्षकांना भुरळ घातली. तथापि, तिच्या आकर्षक सौंदर्य आणि प्रतिभा असूनही, ती बॉलिवूडमध्ये फार काळ यशस्वी होऊ शकली नाही. त्यानंतर, अंजली दक्षिण भारतीय चित्रपटांकडे वळली आणि तेलुगु, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली.

अंजली आता कुठे आहे आणि काय करते?

दक्षिण भारतीय प्रेक्षकांनी तिला मनापासून स्वीकारले आणि तिने देखील अनेक हिट चित्रपट दिले. हिंदीमध्ये, तिने “बेताबी” मध्ये चंद्रचूड सिंगसोबतही काम केले. लग्नानंतर, अंजलीने चित्रपटसृष्टीला निरोप दिला. आता, ती इंडस्ट्रीपासून पूर्णपणे दूर आहे आणि तिचा बहुतेक वेळ मुंबई आणि गोव्यात घालवते. अंजली झवेरीचे लग्न अभिनेता तरुण अरोराशी झाले आहे, तोच तरुण ज्याने “जब वी मेट” मध्ये अंशुमनची भूमिका केली होती. आज, अंजली तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप आनंदी आहे, लाइमलाइटपासून दूर शांत आणि आंनदी जीवन जगत आहे. पण अंजलीमध्ये आता खूप बदल झाला असून तिला इतक्या वर्षांनी ओळखणं आता कठीण झालं आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.