AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही प्रसिद्धी जर त्याचीच वाटत असेल, तर तो मूर्ख; मुलाबद्दल आर. माधवन स्पष्टच बोलला..

आर. माधवनचा मुलगा वेदांत हा फ्री-स्टाइल स्विमर आहे. त्याने अनेक स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल पटकावलं आहे. परंतु यामुळे मिळणाऱ्या प्रसिद्धीला जर वेदांत जर त्याची पात्रता मानत असेल, तर तो मूर्ख आहे, असं स्पष्ट वक्तव्य माधवनने केलंय.

ही प्रसिद्धी जर त्याचीच वाटत असेल, तर तो मूर्ख; मुलाबद्दल आर. माधवन स्पष्टच बोलला..
आर. माधवन आणि त्याचा मुलगा वेदांतImage Credit source: Instagram
| Updated on: May 22, 2026 | 3:40 PM
Share

अभिनेता आर. माधवनचा मुलगा वेदांतने वडिलांच्या पावलांवर पाऊल न ठेवता करिअरसाठी अत्यंत वेगळा मार्ग निवडला. वेदांतने त्याच्यासाठी जो मार्ग निवडला आहे, त्याचा फिल्म इंडस्ट्रीशी दूरदूरपर्यंत काहीच संबंध नाही. मुलाच्या करिअरसाठी आर. माधवन आणि त्याची पत्नी काही वर्षांपूर्वी मुंबई सोडून दुबईला राहायला गेले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो मुलाच्या संगोपनाविषयी आणि त्याच्या करिअर निवडीविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. 20 वर्षांचा वेदांत हा अत्यंत उत्कृष्ट जलतरणपटू आहे. त्याने अनेक प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये सुवर्णपदकं जिंकली आहेत. वेदांतला उत्तर प्रशिक्षण मिळावं यासाठी माधवन आणि त्याची पत्नी सरिता लॉकडाऊनदरम्यान दुबईला शिफ्ट झाले. या दोघांनीही त्यांच्या मुलावर फिल्म इंडस्ट्रीत येण्यासाठी कधीच दबाव टाकला नव्हता आणि म्हणूनच चाहते त्यांचं खूप कौतुक करतात.

अनेकदा वेदांतची इतर स्टारकिड्सशी तुलना केली जाते. मात्र यावर माधवनने स्पष्ट नाराजी व्यक्त केली. “मी आणि सरिता यावर अजिबात खूश नाही. आम्हाला याचं वाईट वाटतं. कारण एका मुलाची दुसऱ्या मुलाशी तुलना करणाऱ्या मीम्सचा उद्देश हा लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा असतो. त्यामुळे असे मीम्स व्हायरल करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातात. आपण इतरांना किती दुखावतोय, याची जाणीवही त्यांना नसते. जेव्हा वेदांतची तुलना इंडस्ट्रीतील इतर स्टार किड्सशी केली जाते, तेव्हा मला आणि सरिताला ते अजिबात आवडत नाही. आम्ही त्याचं अजिबात समर्थन करत नाही”, असं माधवन म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

माधवन एका मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा झाला आणि त्याला त्याच्या मुलामध्येही तीच मध्यमवर्गीय मूल्ये रुजवायची आहेत. लहान वयातच इतकं यश मिळवलेल्या वेदांतबद्दल माधवन पुढे म्हणाला, “मी त्याच्या कर्तृत्वाला कमी लेखत नाही. त्याने जिंकलेल्या सर्व मेडल्ससाठी खूप मेहनत घेतली आहे. स्टारकिड असणं सोपं नसतं. वेदांतच्या वयाइतक्याच त्याच्या मित्रांनी कदाचित अधिक यश मिळवलं असेल, पण त्याला त्यांच्यापेक्षाही जास्त प्रसिद्धी मिळते. त्यामुळे आम्ही इतरांनाही प्रोत्साहन देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. तो कदाचित देशातील सर्वोत्तम जलतरणपटू नसेल, पण तो निश्चितच एका अशा अभिनेत्याचा मुलगा आहे, ज्याने राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे.”

वेदांतला मिळणारी प्रसिद्धी ही दुधारी तलवार असल्याचं माधवनने म्हटलंय. “जर त्याला वाटत असेल की तो या सर्व प्रसिद्धीस पात्र आहे, तर तो मूर्ख आहे. जर तो माझा मुलगा नसता तर त्याला इतकी प्रसिद्धी मिळाली नसती. सुदैवाने माझा मुलगा हे सर्व समजण्याइतका हुशार आहे”, अशा शब्दांत माधवन व्यक्त झाला.

Follow Us
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त...पंतप्रधान मोदींचं नाव घेत नेता...
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त... पंतप्रधान मोदींचं नाव घेत बड्या नेत्याचं खुलं चॅलेंज!
मोठी बातमी! पंजाब, UP सह 7 राज्यांमधील निवडणुकीसाठी भाजपच्या...
मोठी बातमी! पंजाब, उत्तर प्रदेशसह 7 राज्यांमधील निवडणुकीसाठी भाजपच्या हालचाली वाढल्या, दिल्लीत...
खासगी कोचिंग क्लासेससाठी सरकारचे कडक नियम? महाराष्ट्र्शासन मोठ्या...
खासगी कोचिंग क्लासेससाठी सरकारचे नवे कडक नियम? महाराष्ट्र्शासन मोठ्या तयारीत
अमरावती जिल्हा रुग्णालयाला भीषण आग: व्हेंटिलेटर स्फोटात तीन चिमुकले...
अमरावती जिल्हा रुग्णालयाला भीषण आग: व्हेंटिलेटर स्फोटात तीन चिमुकले दगावले, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही