Shilpa Shetty चा पती असल्याचा राज कुंद्रा याला होतोय पश्चाताप? मोठं सत्य समोर…

Shilpa Shetty | 'शिल्पाच्या जागी दुसरी कोणी असती तर...', शिल्पा शेट्टीबद्दल असं का म्हणाला पती राज कुंद्रा? सध्या सर्वत्र राज - शिल्पा यांच्या नात्याची चर्चा... शिल्पा हिच्यासोबत लग्न केल्याचा राज कुंद्रा याला आता होतोय पश्चाताप?

Shilpa Shetty चा पती असल्याचा राज कुंद्रा याला होतोय पश्चाताप? मोठं सत्य समोर...
Follow us
| Updated on: Nov 04, 2023 | 9:27 AM

मुंबई | 4 नोव्हेंबर 2023 : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात जवळपास 2 महिने तुरुंगवास भोगल्यानंतर राज कुंद्रा त्याच्या खासगी आयुष्याबद्दल फार मोठे खुलासे करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राज कुंद्रा याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, शिल्पाच्या पतीची ‘UT 69’ सिनेमा देखील प्रदर्शित झाला. सिनेमात राज कुंद्रा याने तुरुंगात घालवलेल्या एक एक क्षणाबद्दल सांगितलं आहे. आता राज याने शिल्पा हिच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘शिल्पा माझी पत्नी नसती तर, प्रकरण एवढं वाढलं नसतं..’ असं राज म्हणाला.

शिल्पा हिच्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर, राज याच्या मनात पश्चातापाची भावना असल्याचं देखील अनेकांचं म्हणणं आहे. राज म्हणाला, ‘प्रत्येक जण म्हणतो हा तर शिल्पाचा पती आहे… पण शिल्पाचा पती असल्याची भूमिका फार कठीण आहे. माझं कर्तव्य मी प्रामाणिकपणे पूर्ण देखील करत आहे. पण काही कारण नसताना माझं नुकसान होत आहे..’

‘शिल्पा एक प्रसिद्ध स्टार आहे. तिच्या खासगी आयुष्यात काय सुरु आहे, हे जाणून घेण्यासाठी कित्येक लोक उत्सुक असतात. तिचं नाव माझ्या नावासोबत जोडलं गेलं आहे. म्हणून (पॉर्नोग्राफी प्रकरणी) माझी मोठी बातमी झाली. शिल्पासोबत जर माझं लग्न झालं नसतं तर, ब्रेकिंग न्यूज कधीच बनली नसती.. ‘

पुढे राज म्हणाला, ‘शिल्पाचा पती असल्यामुळे प्रकरण वाढलं. बातमीने वेगळं रुप घेतलं. सर्वत्र फक्त शिल्पा आणि शिल्पाच्या पतीची चर्चा होती. पण ठिक आहे. लाईमलाईटमध्ये राहाण्याचे फायदे देखील आहेत आणि तोटे देखील…’ पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकल्यानंतर राज कुंद्रा कायम मास्क घालून बाहेर निघायचा. पण आता त्याने मास्क न लावण्याचा निर्णय घेतला.

गेल्या काही दिवसांपासून शिल्पा आणि पती राज कुंद्रा कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत आहेत. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर खुद्द शिल्पा पती आणि मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

सांगायचं झालं तर, पती पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकल्यानंतर शिल्पा हिने जबाबदारीने न खचता मुलांचा सांभाळ केला. शिल्पाने कठीण काळात पतीची साथ सोडली नाही. आज शिल्पा तिच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.