AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Shivaji : अक्षय कुमारने बिघडवला रितेशचा खेळ; ‘राजा शिवाजी’ला 4 चित्रपटांकडून टक्कर, तिसऱ्याच दिवशी कमाईला ब्रेक

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाला सध्या बॉक्स ऑफिसवर चार चित्रपटांकडून टक्कर मिळतेय. त्यातही मार्च आणि एप्रिलमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचीही कमाई चांगली होत आहे. त्यामुळे 'राजा शिवाजी'च्या कमाईची गती कमी झाल्याचं पहायला मिळतंय.

Raja Shivaji : अक्षय कुमारने बिघडवला रितेशचा खेळ; 'राजा शिवाजी'ला 4 चित्रपटांकडून टक्कर, तिसऱ्याच दिवशी कमाईला ब्रेक
Raja Shivaji vs bhooth banglaImage Credit source: Instagram
| Updated on: May 04, 2026 | 8:27 AM
Share

अभिनेता रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. याच दिवशी ओटीटीवरही अनेक चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यातही मार्च आणि एप्रिल महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. ‘राजा शिवाजी’ची सुरुवात चांगली झाली असली तरी हिंदी भाषेत हा चित्रपट आता मागे पडताना दिसतोय. जर हा चित्रपट वीकेंडला हिंदीइतकी चांगली कामगिरी करू शकला नाही, तर आणखी अडचणी निर्माण होऊ शकतात. रितेशच्या ‘राजा शिवाजी’ला प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. परंतु मार्च-एप्रिलमध्ये प्रदर्शित झालेले ‘धुरंधऱ 2’, ‘भूत बंगला’ आणि ‘मायकल’ यांची घोडदौड थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यातही ‘द डेव्हिल वेअर्स प्राडा 2’ला भारतात इतका सकारात्मक प्रतिसाद मिळेल याची कोणी कल्पना केली नव्हती.

‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘राजा शिवाजी’ने हिंदीमध्ये प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी 4.25 कोटी रुपये कमावले आहेत. तर मराठी भाषेत 7.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने रविवारी 12 कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामुळे भारतातील आतापर्यंतची कमाई 33.90 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ‘राजा शिवाजी’ने प्रदर्शनाच्या दिवशी 11.35 कोटी रुपये कमावले होते. तर दुसऱ्या दिवशी 10.55 कोटी रुपयांपर्यंत कमाईचा आकडा पोहोचला होता. यामुळे आतापर्यंत एकूण कमाई 40.34 कोटी रुपये झाली आहे.

अक्षय कुमारने ‘भूत बंगला’ या चित्रपटातून चांगलंच यश मिळवलं आहे. या चित्रपटाने भारतात प्रदर्शनाच्या 17 व्या दिवशी म्हणजेच रविवारी 5.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामुळे भारतीय बॉक्स ऑफिसवर कमाईचा आतापर्यंतचा आकडा 142.50 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर जगभरात या चित्रपटाने 225.52 कोटी रुपये कमावले आहेत. रविवारी भारतात अक्षयच्या चित्रपटाने ‘राजा शिवाजी’पेक्षा जास्क कमाई केल्यामुळे ‘भूत बंगला’ने रितेशच्या चित्रपटाला मागे टाकलं आहे.

‘द डेव्हिल वेअर्स प्राडा 2’ हा हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले आहेत. रविवारी या चित्रपटाने 3.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर आतापर्यंत या चित्रपटाच्या कमाईचा आकडा 13.35 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे मायकल जॅक्सनच्या आयुष्यावर आधारित ‘मायकल’ हा चित्रपटसुद्धा सातत्याने चांगली कमाई करत आहेत. या सर्व चित्रपटांचा परिणाम ‘राजा शिवाजी’वर होताना दिसत आहे. रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’ने आधीच ‘बाहुबली 2’चा विक्रम मोडला आहे. हा चित्रपट अजूनही लाखो रुपयांची कमाई करत आहेत.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!