AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ सिनेमाची घोडदौड सुरूच, आता रचणार मोठा विक्रम

Raja Shivaji : अभिनेता रितेश देशमुख स्टारर 'राजा शिवाजी' सिनेमा सध्या तुफान चर्चेत आहे. सिनेमा 1 मार्च रोजी प्रदर्शित झाला असून, 15 व्या दिवशी देखील सिनेमाने मोठी कमाई केली आहे. तर आता 'राजा शिवाजी' सिनेमा मोठा विक्रम रचणार आहे.

Raja Shivaji : 'राजा शिवाजी' सिनेमाची घोडदौड सुरूच, आता रचणार मोठा विक्रम
राजा शिवाजी सिनेमा
| Updated on: May 16, 2026 | 8:08 AM
Share

Raja Shivaji : ऐतिहासिक सिनेमा ‘राजा शिवाजी’ सिनेमा 1 मे रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली आहे. गेल्या 15 दिवसांपासून ‘राजा शिवाजी’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर उत्तम परफॉर्म करताना दिसत आहे… अभिनेता रितेश देखमुख दिग्दर्शित आणि स्टारर ‘राजा शिवाजी’ सिनेमा लवरकच मोठा विक्रम रचणार आहे. दोन आठवड्यात सिनेमाने भारतात तब्बल 75 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. आता सिनेमाने तिसऱ्या आठवड्यात एन्ट्री केली आहे… तर जाणून घ्या तिसऱ्या आठवड्यात सिनेमाने किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे.

‘राजा शिवाजी’ सिनेमाने 15 व्या दिवशी किती कमाई केली?

‘राजा शिवाजी’ने बॉक्स ऑफिसवर दोन आठवडे दमदार कामगिरी केली. या काळात सिनेमाने बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवले. मात्र, प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करताच, त्याला आयुष्मान खुरानाच्या ‘पती पत्नी और वो’ आणि संजय दत्तच्या ‘आखिरी सवाल’ या सिनेमांकडून स्पर्धेला सामोरं जावं लागलं. तरीही, या नवीन सिनेमांनी ‘राजा शिवाजी’ची क्रेझ कमी केली नाही आणि सिनेमाने 15 व्या दिवशी, म्हणजेच तिसऱ्या शुक्रवारी, दमदार कमाई केली.

‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाने पहिल्या आठवड्यात 52.65 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात सिनेमा जवळपास 24.30 कोटी रुपयांची कमाई केली. आता सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘राजा शिवाजी’ने प्रदर्शनाच्या 15 व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या शुक्रवारी 1.45 कोटी रुपयांची कमाई केली आहे. म्हणजेच सिनेमा 15 दिवसांत तब्बल 78.40 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘राजा शिवाजी’ने प्रदर्शनाच्या पहिल्या 15 दिवसांत 78.40 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘बाईपण भारी देवा’ 76.28 कोटी रुपयांच्या लाईफटाईम कलेक्शनला मागे टाकत, हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला आहे. आता हा सिनेमा ‘सैराट’चा 80.98 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्यापासून फक्त 2 कोटी रुपये दूर आहे. ‘राजा शिवजी’ सिनेमा तिसऱ्या शनिवारी हा टप्पा ओलांडून सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी सिनेमाचा विक्रम आपल्या नावावर करेल… अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘राजा शिवाजी’ सिनेमाची कास्ट

‘राजा शिवाजी’ सिनेमात अभिनेता रितेश देशमुख याने मुख्य भूमिका म्हणजे महाराजांची भूमिका साकारली आहे. तर सिनेमात अनेक बॉलिवूड कलांकारांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सिनेमात अभिषेक बच्चन, संजय दत्त, जिनिलिया डिसूजा, विद्या बालन, भाग्यश्री, बोमन ईराणी, सचिन खेडकर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहे. तर अभिनेता सलमान खान याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...