राजेश्वरी खरात लवकरच देणार गुडन्यूज…जब्याचं नाव घेत केला मोठा गौप्यस्फोट; म्हणाली लवकरच…
राजेश्वरी खरात हिने जब्या अर्थात सोमनाथ अवघडे याचे नाव घेत लवकरच मी तुम्हाला मोठी गुडन्यूज देणार आहे, असं तिच्या चाहत्यांना सांगितलं आहे.

Rajeshwari Kharat : फ्रँड्री चित्रपातली शालू म्हणजेच राजेश्वरी खरात ही मराठोळी अभिनेत्री नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. तिचे इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर लाखोंनी फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे ती सोशल मीडियावर नेहमीच तिचे वेगवेगळे फोटो शेअर करत असते. दरम्यान, आता तिने तिच्या चाहत्यांना मोठी माहिती दिली आहे. मी लवकरच तुम्हाला एक मोठी गुडन्यूज देणार आहे, असं तिनं म्हटलंय.
राजेश्वरीने केलं मोठं विधान
राजेश्वरी खरातने नुकतेच राजश्री मराठी या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने वेगवेगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर दिलखुलासपणे गप्पा केल्या आहेत. याच मुलाखतीत तिने फ्रँड्री चित्रपटातील जब्या म्हणजेच सोमनाथ अवघडे याच्याविषयी बोलत असताना मोठं विधान केलंय. मी लवकरच तुम्हाला आगामी काही दिवसांत गुडन्यूज देणार आहे, असं तिनं सांगितलंय.
दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल
गेल्या काही दिवसांपासून राजेश्वरी खरात आणि सोमनाथ अवघडे हे त्यांत्या सोशल मीडिया खात्यावर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत आहेत. काही फोटोंमध्ये राजेश्वरी आणि सोमनाथ यांना हळद लागताना दिसत आहे. तर काही फोटोंमध्ये हे दोघेही डोक्यावर बांशींग बांधून उभे असल्याचे दिसत आहेत. त्यामुळेच त्यांचे लग्न झाले आहे की काय? असा प्रश्न दोघांच्याही चाहत्यांना पडला आहे. यावरच प्रश्न विचारला असता मी लवकरच तुम्हाला गुड न्यूज देणार आहे, असं राजेश्वरी खरातने सांगितलंय.
राजेश्वरी खरात नेमकं काय म्हणाली?
“जब्या आणि राजेश्वरी यांचे व्हायरल होत असलेल्या फोटोंचं प्रकरण मी अजून थोडसं गुपितच ठेवते. कारण आमचं लग्न झालंय की नाही हे लोकांना ठरवू द्या. मी पुढच्या काही दिवसांत सर्वांना गुडन्यूज देणार आहे. पण सध्यातरी हे गुपित ठेवायचं आहे. पण सांगायचं झालं तर सोमनाथसोबत माझं बरचसं शूटिंग झालं आहे. लवकरच खूप सारे प्रोजेक्ट्स, स्टोरीज आणि स्क्रिप्ट तुमच्यासमोर येणार आहे,” असं राजेश्वरी खरातने आपल्या चाहत्यांना सांगितलं आहे. दरम्यान, राजेश्वरी खरातने दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर लवकरच राजेश्वरी आणि सोमनाथ यांचा नवा चित्रपट किंवा वेबमालिका येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
