Video : जीव झाला येडापिसा रात रात जागनं….शालूची ही झकास अंदा पाहिली का?

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 14, 2021 | 5:15 PM

‘फँड्री’ (Fandry) या चित्रपटातील शालू म्हणजेच राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat)नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते.

Video : जीव झाला येडापिसा रात रात जागनं....शालूची ही झकास अंदा पाहिली का?
Follow us

मुंबई : ‘फँड्री’ (Fandry) या चित्रपटातील शालू म्हणजेच राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat)नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. ती चाहत्यांसाठी वेगवेगळे बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये राजेश्वरी एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. (Rajeshwari Kharat’s latest dance video goes viral)

View this post on Instagram

A post shared by Rajeshwari Kharat (@rajeshwariofficial)

शालूने काही दिवसांपूर्वी तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन तिचा सुंदरसा फोटो पोस्ट केला होता. ‘आ मेरे दिल मैं बस जा मेरे आशिक़ आवारा’, असं कॅप्शन देऊन तिने आशिक पोरांना प्रेमाची साद घातली होती. साहजिकच पोरांनी शालूच्या फोटोवर उड्या मारल्या. ‘कुणी तोडलंस.. जिंकलंस…. ठार केलंस’ अशा खास कोल्हापुरी अंदाजातल्या कमेंट केल्या… तर काहींनी मात्र शालूची फिरकी घेतली.

अशाच फिरकी घेणाऱ्या चाहत्यांना राजेश्वरीने तिच्या गावरान अंदाजात उत्तर दिलं होत त्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत होती. शालूने आपल्या कमेंटमध्ये म्हटंले होते की “नारळ फेकून मारीन आज जर कुणी फालतू कमेंट केल्या तर…”, ही कमेंट करताना तिने नारळ हातात घेतलेला आणखी एक फोटो पोस्ट केला… मग तर काय चाहत्यांची कमेंट करण्यासाठी झुंबड उडाली होती.

संबंधित बातम्या : 

Video | फँड्रीतल्या ‘शालू’चा हा जलवा बघितलात का? पिरतीचा इंचू चावणारच !

Video : ‘हाता तोंडाम्होरं घास परी गिळना, गेला जळून जळून जीवं प्रीत जुळना’; शालूच्या अदांनी चाहत्यांच्या काळजाचे पाणीपाणी

Video | शालूचा किलर डान्स! चाहते म्हणतात, ‘भिरभिर मनाला या घालू कसा बांध गं..?’

(Rajeshwari Kharat’s latest dance video goes viral)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI