AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रजनीकांत-कमल हसनची प्रसिद्ध हिरोईन, नंतर वेश्याव्यवसाय करू लागली, AIDS झाला आणि… असं काय घडलं तिच्याबाबत?

Actress Life: रजनीकांत - कमल हसन यांच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर वेश्याव्यवसाय करण्याची वेळ आली तेव्हा... अखरे अभिनेत्रीला झाली AIDS ची लागण... त्यानंतर मात्र..., तिच्यासोबत असं घडलं तरी काय?

रजनीकांत-कमल हसनची प्रसिद्ध हिरोईन, नंतर वेश्याव्यवसाय करू लागली, AIDS झाला आणि... असं काय घडलं तिच्याबाबत?
फाईल फोटो
| Updated on: Jul 12, 2025 | 1:25 PM
Share

Actress Life: झगमगत्या विश्वात कधी काय होईल याची काहीच कल्पना नसते… आता प्रसिद्धी झोतात असलेल्या सेलिब्रिटीसोबत पुढे काही होईल हे सांगणं फार कठीण आहे. विशेषतः अभिनेत्रींबद्दल काहीही बोलणं फार कठीण आहे. झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना पोटाची भूक भागवण्यासाठी नको तो व्यवसाय करण्याची वेळ आली. असंच काही अभिनेते रजनीकांत आणि कमल हसन यांच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत देखील झालं. करीयरच्या सुरुवातील अभिनेत्री यशाच्या शिखरावर होती. पणनंतर सर्वकाही होत्याचं नव्हतं झालं. वेश्याव्यवसायामुळे अभिनेत्रीला AIDS झाला आणि शेवटच्या क्षणी तिच्यासोबत कोणीच नव्हतं.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री निशा नूर होती. एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त निशा नूर हिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा रंगली आहे. पण ही चर्चा काही दिवसांनंतर अभिनेत्रीच्या वेश्याव्यवसायाकडे वळली आणि त्यानंतर तिच्या मृत्यूकडे.

अभिनेत्रीने तमिळ आणि मल्याळम भाषेत अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. पण एक वेळ अशी आली की तिला सिनेमांमध्ये काम मिळणं बंद झालं आणि अभिनेत्रीने चुकीच्या मार्ग स्वीकारला. जसजशी निशाची प्रेक्षकांमधील क्रेझ कमी होत गेली, तसतशी ती बेरोजगार झाली. कारण निशाला मुख्य अभिनेत्रीची भूमिका देऊन कोणत्याही दिग्दर्शकाला धोका पत्करायचा नव्हता.

सिनेमांमध्ये काम मिळणं बंद झाल्यानंतर निशा देहव्यापारात म्हणजेच वेश्याव्यवसायात बळजबरीने अडकली आणि इथूनच तिच्या आयुष्यातील वाईट टप्पा सुरू झाला. सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगू लाहली. अभिनेत्रीला फक्त बदनामीच नाही तर, गंभीर आजाराचा देखील सामना कराला लागल. एड्ससारखा भयंकर आजार अभिनेत्रीला झाला.

पूर्वी कायम चाहत्यांच्या घोळक्यात राहणारी निशा शेवटच्या क्षणी मात्र एकटीच पडली. शेवटच्या क्षणी निशा हिच्याकडे कोणीच नव्हतं. रिपोर्टनुसार, 2007 मध्ये निशा दर्ग्याच्या बाहेर अत्यंत वाईट अवस्थेत सापडली होती. तिची ओळख पटणं देखील कठीण झालं होतं.

अभिनेत्रीचं शरीर अशक्त झालं होतं. धक्कादायक गोष्ट म्हणजे अखेरच्या क्षणी अभिनेत्रीच्या अंगावर किडे रेंगाळू लागलं. तपसणी झाल्यानंतर अभिनेत्रीला एड्स झाल्याचं निष्पन्न झालं. आजारामुळे अभिनेत्रीचं 23 एप्रिल 2007 निधन झालं.

Follow Us
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
नीट परीक्षा आणि तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार