राजकुमार रावविरोधात थेट अटक वॉरंट; धार्मिक भावना भडकवण्याचा आरोप
अभिनेता राजकुमार राव नुकताच जालंधर न्यायालयात हजर झाला. त्याने स्वत:ला सरेंडर केलं होतं. धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी त्याच्यावर खटला सुरु होता. त्यासाठी त्याला समन्स बजावून देखील तो न्यायालयात हजर न राहिल्याबद्दल राजकुमारविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव अडचणीत आला आहे. राजकुमारवर धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत गुन्हाही दाखल करण्यात आला होता, परंतु जेव्हा अभिनेत्याविरुद्ध समन्स जारी करण्यात आले तेव्हा ते त्याच्या चुकीच्या पत्त्यावर पोहोचले. ज्यामुळे तो न्यायालयात हजर राहू शकला नाही. नंतर राजकुमार रावविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अभिनेता राजकुमार राव नुकताच जालंधर न्यायालयात हजर झाला. त्याने स्वतःला उपस्थिती दशर्वली. प्रत्यक्षात, धार्मिक भावना भडकवण्याच्या प्रकरणात हजर न राहिल्याने राजकुमारविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. धार्मिक भावना भडकवण्याच्या प्रकरणात राजकुमार रावने सोमवारी, म्हणजे 28 जुलै रोजी जालंधरच्या जेएमआयसी न्यायाधीश श्रीजन शुक्ला यांच्या न्यायालयात सरेंडर केलं.
राजकुमार यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं
न्यायालयात हजर न राहिल्याने राजकुमार यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 जुलै रोजी झाली, ज्यामध्ये बचाव पक्षाचे वकील दर्शन सिंह दयाल यांनी निवेदन दिलं. त्यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. अखेर राजकुमार रावला न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर तपासात सामील झाला असल्याचं स्पष्ट केलं. पोलिसांनी तपास पूर्ण केला आणि न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले, परंतु न्यायालयाने ज्या पत्त्यावर समन्स पाठवले होते तो पत्ता (प्रेम नगर गुडगाव) इथला होता त्यामुळे ते समन्स अभिनेत्यापर्यंत पोहोचलेच नव्हते. कारण अभिनेता आता तिथे राहत नाही.
- Rajkummar Rao
स्वतःला न्यायालयात सरेंडर केलं.
सध्या राजकुमार राव अंधेरी पश्चिम, मुंबई येथील ओबेरॉय स्प्रिंग्स येथे राहतो. त्यामुळे समन्स न मिळाल्यामुळे राजकुमार राव हजर राहू शकला नाही. वकिलाने असा युक्तिवाद केला की जेव्हा हे प्रकरण राजकुमार रावच्या लक्षात आलं तेव्हा त्याने स्वतःला न्यायालयात सरेंडर केलं. न्यायालयाने बचाव पक्षाच्या युक्तिवादाशी सहमती दर्शवत राजकुमारला जामीन मंजूर केला आहे.
हे प्रकरण 2017 सालचे आहे.
राजकुमार राववर जी केस सुरू होती ती 2017 पासून होती. त्याचा ‘बहन होगी तेरी’ या चित्रपटाबाबत ते प्रकरण होते. हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. राजकुमार राव श्रुती हसनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसला होता. चित्रपटाच्या पोस्टरवर राजकुमार राव भगवान शिवाच्या रूपात दिसला होता. तो एका बाईकवर स्वार होता, ज्यावर उत्तर प्रदेशचा नंबर होता. पोस्टरमध्ये अभिनेत्याने रुद्राक्षाची माळ घातली होती आणि डोक्यावर चंद्र होता. त्याच्या याच रुपावरून त्याच्यावर लोकांमध्ये धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर जालंधर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. चित्रपटाचे दिग्दर्शक अजय के पन्नालाल आणि निर्माता टोनी डिसूझा यांच्याविरुद्धही खटला दाखल करण्यात आला. नंतर दोघांनाही जामीन मंजूर करण्यात आला.
