AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Srivastava: राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीविषयी कॉमेडियन एहसान कुरेशीने दिली महत्त्वाची माहिती

बुधवारी जिममध्ये व्यायाम करताना राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला आणि त्यांना तातडीने दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Raju Srivastava: राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीविषयी कॉमेडियन एहसान कुरेशीने दिली महत्त्वाची माहिती
एहसान कुरेशीने दिली महत्त्वाची माहितीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 1:56 PM

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava)  यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी जिममध्ये व्यायाम करताना राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला आणि त्यांना तातडीने दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक आहे. ते व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान राजू यांचे मित्र आणि कॉमेडियन एहसान कुरेशी (Ahsaan Qureshi) यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत नवी माहिती दिली आहे. राजू श्रीवास्तव यांचा मेंदू नीट काम करत नसल्याचं एहसान कुरेशी यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले एहसान कुरेशी?

एका ऑनलाइन पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत एहसान कुरेशी म्हणाले, “डॉक्टरांनी कुटुंबीयांना राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत अद्याप प्रतीक्षा करण्यास सांगितलं आहे, कारण ते सध्या आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. काही तासांपूर्वी डॉक्टरांनी सांगितलं की राजू यांनी काही हलक्या हालचाली केल्या आहेत. पण त्यांचा मेंदू पूर्णपणे कार्य करत नाहीये किंवा प्रतिसाद देत नाहीये.”

एहसान कुरेशीने असंही सांगितलं की, त्यांना दिल्लीला जाऊन राज श्रीवास्तव यांची प्रकृती जाणून घ्यायची होती, परंतु राजू यांच्या पत्नीने त्यांना दिल्लीत येण्यास नकार दिला. एहसान कुरेशी म्हणाले की, राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीने त्यांना दिल्लीत येण्यास मनाई केली आहे. कारण रुग्णालयातील डॉक्टर त्यांना अधिक लोकांना भेटू देत नाहीयेत. कुरेशी म्हणाले की, त्यांचे काही मित्र दिल्लीत आहेत, जे त्यांना राजूच्या प्रकृतीबाबत वेळोवेळी अपडेट्स देत आहेत.

हे सुद्धा वाचा

राजू श्रीवास्तव यांनी बुधवारी सकाळी व्यायाम केला होता. त्याच दिवशी ते पुन्हा एकदा वर्कआऊट करायला गेले तेव्हा त्यांना बरं वाटत नव्हतं. त्यानंतर त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यांच्या ट्रेनरने त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेलं, जिथे डॉक्टरांनी विलंब न करता त्यांना CPR दिला. सध्या राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक आहे. राजू श्रीवास्तव लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

पंतप्रधान मोदींकडून मदतीचं आश्वासन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीला फोन केला होता. मोदींनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि मदतीचं आश्वासनही दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राजू श्रीवास्तव यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली होती. राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ यांनीही कुटुंबाला मदतीचं आश्वासन दिलं आहे.

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.