Raju Srivastava: 42 तासांपासून राजू श्रीवास्तव यांना शुद्धच नाही; पंतप्रधान मोदींनी कुटुंबीयांना दिलं मदतीचं आश्वासन

मोदींनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि मदतीचं आश्वासनही दिलं. राजू श्रीवास्तव यांना बुधवारी जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Raju Srivastava: 42 तासांपासून राजू श्रीवास्तव यांना शुद्धच नाही; पंतप्रधान मोदींनी कुटुंबीयांना दिलं मदतीचं आश्वासन
Raju SrivastavaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 11:22 AM

कॉमेडियन आणि उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची प्रकृती अद्यापही नाजूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीला फोन केला होता. मोदींनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि मदतीचं आश्वासनही दिलं. राजू श्रीवास्तव यांना बुधवारी जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांची अँजिओप्लास्टी केली असून सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राजू श्रीवास्तव यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली होती. राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ यांनीही कुटुंबाला मदतीचं आश्वासन दिलं आहे. योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये लिहिलं होतं, ‘सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तवजी यांच्या पत्नीशी बोलल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळाली. प्रभू श्री राम यांच्याकडे ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी कामना करत आहे.’

हे सुद्धा वाचा

राजू श्रीवास्तव अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यांना गेल्या 46 तासांपासून शुद्ध आलेली नाही. राजू श्रीवास्तव यांच्यावर एम्सच्या वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. राजू यांची अँजिओग्राफी केली असता त्यांच्या हृदयात 100% ब्लॉकेज आढळले आहेत. राजू श्रीवास्तव यांचे भाऊ आशिष श्रीवास्तव म्हणाले, “राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये जात असताना हृदयविकाराचा झटका आला. ते राज्यातील काही बड्या नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत थांबले होते. ते सकाळी जिममध्ये गेले आणि त्याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे.”

राजू यांना लहानपणापासूनच विनोदाची आवड होती. त्यांना कॉमेडियन व्हायचं होतं. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात ‘टी टाइम मनोरंजन’ या टीव्ही शोमधून केली होती. दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये राजू, सुरेश मेनन आणि ब्रजेश हरजी यांसारख्या कलाकारांसोबत स्टेज शेअर करताना दिसले. मात्र, ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मधून त्यांना खरी ओळख मिळाली. या शोमध्ये त्यांनी आपला यूपीचा अंदाज दाखवला आणि आपल्या पंच लाइनने लोकांना हसवलं.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.