तू या मॅटरमध्ये पडू नको, बिश्नोईच्या धमकीनंतर राखी सावंत घाबरली.. काय निर्णय घेतला?

राखी सावंतला आलेल्या ईमेलमध्ये लिहिलंय.. राखी, तुझं आणि आमचा काही वाद नाही. तू सलमान खान प्रकरणात इनवॉल्व होऊ नको...

तू या मॅटरमध्ये पडू नको, बिश्नोईच्या धमकीनंतर राखी सावंत घाबरली.. काय निर्णय घेतला?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 11:16 AM

गोविंद ठाकूर, मुंबई : अभिनेता सलमान खानला (Salman Khan) मिळालेल्या धमकीनंतर आता राखी सावंतलाही (Rakhi Sawant) धमकीचे ईमेल आलेत. सलमान खान आणि राखी सावंत यांच्यातील नातं जगजाहीर आहे. भाऊ म्हणून सलमान खानने राखी सावंतला अनेकवेळा मदत केली आहे. मात्र राखी सावंतने सलमान खानपासून दूर रहावं, त्याला मिळालेल्या धमक्यांविषयी बोलू नये, असा इशारा देण्यात आलाय. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावानेच राखी सावंतला असे ईमेल आलेत. तू या मॅटरमध्ये पडू नकोस, असं सांगण्यात आलंय. या धमकीमुळे राखी सावंत प्रचंड घाबरली आहे. राखी सावंत आता तिचा लूक कसा बदलायचा याबाबत तिच्या जवळच्या नातेवाईकांकडून सल्ला घेत आहे.

राखी सावंतला काय ईमेल?

राखीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलंय, मला धमकीचे ईमेल आलेत. लॉरेन्स बिश्नोई गँगचे ते सदस्य असल्याचं म्हटलंय. तू सलमान खानविषयी काही बोललीस तर तुलाही मारू, असा इशारा ईमेलमधून देण्यात आलाय.

पण सलमान खानविषयी मी बोलत राहणार. माझी आई आजारी असताना, त्याने खूप मोठी मदत केली होती. आई कँसरशी झुंज देत असताना सलमान खानने ५० लाख रुपये खर्च केला जोता. मी का त्याच्याविषय़ी बोलू नको? लॉरेन्स बिश्नोई गँगने सिद्धू मूसेवाला यालाही मारलं. माणूस जिवंत असेल तर आपण त्याची बाजू घेऊ नये का, असा सवाल राखी सावंतने केला.

मी गोंधळलेय, घाबरले…

मुलाखतीत राखी सावंत म्हणाली की, मी याविरोधात कायदेशीर कारवाई करत नाहीये. पण मी खूप घाबरले आणि गोंधळले आहे. या प्रकरणाचं काय करयाचं, हे माहिती नाही. मी हे सगळं देवावर सोडते.

राखी सावंतला आलेले ईमेल हे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बराडशी संबंधित सदस्यांनी पाठवल्याचा दावा करण्यात आलाय. राखी सावंतला पहिला ईमेल १८ एप्रिल रोजी सकाळी ७.२२ वाजता आला होता. तर दुसरा ईमेल त्याच दिवशी दुपारी १ वाजून १९ मिनिटांनी आला होता.

या ईमेलमध्ये लिहिलंय, राखी, तुझं आणि आमचा काही वाद नाही. तू सलमान खान प्रकरणात इनवॉल्व होऊ नको. नाहीतर तुला प्रॉब्लेम होईल. तुझा भाऊ सलमानला आम्ही मुंबईतच मारू. त्यानं कितीही सुरक्षा वाढवू देत. आता तर त्याला सुरक्षा व्यवस्थेतच मारणार. राखी, तुझ्यासाठी शेवटची वॉर्निंग आहे. नाही तर तू तयार रहा..

तर दुसऱ्या ईमध्ये लिहिलंय… राखी तुला शेवटचं सांगतोय. सलमान खानला कुणीही वाचवू शकत नाही. आम्हाला कुणाची भीती नाही. सलमान खानचा अहंकार तोडायचा आहे. पैसा आणि पॉवरचा खूप गर्व आहे त्याला. त्याने गोल्डी भाईशी बोलावं नाही तर तयारी ठेवावी.. लवकरच त्याला त्याच्या घराबाहेर मारू..

सलमान खानलादेखील अनेक वेळा धमक्या आल्या आहेत. १० एप्रिल रोजी एक धमकी पुन्हा आली. फोनवरून कॉलरने त्याचं नाव जोधपूरहून गौरक्षक रॉकी भाई असं सांगितलं होतं. ३० एप्रिल रोजी सलमान खानला खतम करणार, असं संबंधिताने फोनवर सांगितलं होतं…

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.