Rakhi Sawant | भावाच्या मदतीला धावून आली राखी सावंत, सलमान खानच्या ‘त्या’ प्रकरणावर अभिनेत्रीचे मोठे भाष्य

राखी सावंत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. राखी सावंत ही नेहमीच तिच्या विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात देखील सापडते. काही दिवसांपूर्वीच गरीब मुलांची मदत करताना राखी सावंत ही दिसली होती. विशेष म्हणजे त्या मुलांसोबत फोटोही घेताना राखी दिसली होती.

Rakhi Sawant | भावाच्या मदतीला धावून आली राखी सावंत, सलमान खानच्या त्या प्रकरणावर अभिनेत्रीचे मोठे भाष्य
| Updated on: Aug 09, 2023 | 4:19 PM

मुंबई : राखी सावंत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. राखी सावंत (Rakhi Sawant) ही तिच्या पर्सनल लाईफमुळे अधिक चर्चेत असते. बिग बाॅस मराठीमधून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत हिने सर्वांनाच मोठा धक्का देत आपले लग्न (Marriage) झाल्याचे जाहिर केले. राखी सावंत हिने आदिल दुर्रानी (Adil Durrani) नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केले. इतकेच नाही तर राखी सावंत हिने लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर सतत आदिल याच्यासोबत स्पाॅट होताना राखी सावंत दिसली होती. मात्र, यांचा सुखाचा संसार फार काळ टिकू शकला नाही.

काही दिवसांमध्ये राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. इतकेच नाहीत हे प्रकरण थेट कोर्टात जाऊन पोहचले. आदिल दुर्रानी हा सध्या जेलमध्ये आहे. राखी सावंत हिने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले की, काहीही झाले तरीही आदिल याला घटस्फोट देणार नाहीये, कारण तो अजून मुलींचे आयुष्य खराब करेल.

नेहमीच राखी सावंत ही सलमान खान याच्या सपोर्टमध्ये दिसते. नुकताच आता राखी सावंत हिने सलमान खान याच्याबद्दल मोठे भाष्य केले आहे. काही दिवसांपासून सतत एक चर्चा आहे की, बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये झालेल्या एका प्रकरणानंतर सलमान खान याच्या फॅन फाॅलोइंगमध्ये घट होत आहे.

अनेकांनी सलमान खान याला फाॅलो करणे सोडून दिले आहे. यावरच भाष्य करताना आता राखी सावंत ही दिसली आहे. राखी सावंत ही म्हणाली की, 3 मिलियन फॉलोवर्स कमी झाले तर काय…50 मिलियन वाढतील. बिग बाॅसच्या घरात एल्विश यादव याच्यासोबत झालेल्या वादानंतर सलमान खान याचे फॉलोवर्स कमी झाल्याचे सांगितले जात होते.

सलमान खान याचे फॉलोवर्स कमी झाल्याचा दावा खोटा असल्याचे देखील सांगितले जात आहे. सर्वांनाच माहिती आहे की, सलमान खान याला बाॅलिवूडचा दबंग खान म्हणून देखील ओळखले जाते. सलमान खान याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. फक्त भारतामध्येच नाही तर विदेशातही सलमान खान याचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत.

सलमान खान याला काही दिवसांपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे सततच्या मिळणाऱ्या धमक्यांमुळे सलमान खान याच्या सुरक्षेमध्येही मोठी वाढ करण्यात आलीये. सलमान खानला काही दिवसांपूर्वीच एक ईमेल करण्यात आला होता, या ईमेलमध्येच त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.