Bigg Boss 14 | घरच्यांनी आणला राखीच्या नाकात दम… राखी रडून रडून बेजार!

बिग बॉस 14 (Bigg Boss 14) मध्ये सर्वात जास्त मनोरंजन करणारी स्पर्धेक म्हणून अभिनेत्री राखी सावंतकडे बघितले जाते. मात्र, आता हीच राखी बिग बॉसच्या घरात रडताना दिसत आहे.

Bigg Boss 14 | घरच्यांनी आणला राखीच्या नाकात दम... राखी रडून रडून बेजार!
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jan 12, 2021 | 3:05 PM

मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) मध्ये सर्वात जास्त मनोरंजन करणारी स्पर्धेक म्हणून अभिनेत्री राखी सावंतकडे बघितले जाते. मात्र, आता राखी बिग बॉसच्या घरात रडताना दिसत आहे. राखी बिग बॉसच्या घराची कॅप्टन बनली आहे पण घरातील सर्वच सदस्यांनी ठरवले आहे की, राखीला यशस्वी कॅप्टन होऊ द्यायचे कोणीही राखीचे काहीही काम ऐकत नाही. नुकताच बिग बॉस शोचा एक प्रोमोसमोर आला आहे त्यामध्ये राखी अर्शी खानला बाथरूम साफ करायला सांगते मात्र, अर्शी राखीला म्हणते की, मी नाही करणार यानंतर राखी आणि इजाज यांच्यात भांडण झाली. (Rakhi Sawant is targeted in the house of Bigg Boss)

घरातील कोणतेच सदस्य राखीने सांगितलेले काम ऐकत नसल्यामुळे राखी रडताना दिसत आणि म्हणते कॅप्टन होऊन मी चुक केली. सोनाली फोगाट निक्कीला तिच्या बेडवरील जेवणाचा बॉक्स उचलण्यास सांगते पण निक्की सोनालीच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. त्यावेळी सोनाली ते सर्व अन्न निक्कीच्या बेडवर फेकून देते. राखी सावंत घराची कॅप्टन असल्यामुळे नॉमिनेशन प्रक्रियेतून सुरक्षित राहते तिला बिग बॉसच्याकडून एक विशेष अधिकार देण्यात येतो.

त्यामध्ये ती घरातील एक सदस्याला नॉमिनेशन प्रक्रियेतून सुरक्षित करू शकते. यावर राखी सावंत घरातील सर्व सदस्यांना धक्का देत अभिनव शुक्लाचे नाव घेते. यामुळे नॉमिनेशन प्रक्रियेतून अभिनव सुरक्षित राहतो. मात्र, राखीच्या या निर्णयावर सोनाली फोगाट भडकली असते तिचे म्हणणे होते की, राखीने मला अगोदर सांगितले होते मला सुरक्षित करणार आहे.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 :विकास गुप्ताची तब्येत पुन्हा खालावली, घरातून गायब!

जास्मीनपासून वेगळं होताना अली गोनीला हुंदका, चाहते म्हणाले, ओव्हरअ‌ॅक्टिंगचे 50 रुपये कापा

Bigg Boss 14 | बायकोसमोर अभिनवने राखीला नेसवली साडी, राखी म्हणते साडी घातली की समोसा बनवला!

(Rakhi Sawant is targeted in the house of Bigg Boss)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें