AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राखी सावंत हिच्या कुटुंबाबद्दल मोठी माहिती समोर; ड्रामा क्वीनचं खरं नाव काय ?

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत कायम हिच्या कुटुंबाबद्दल मोठी गोष्ट समोर, राखी सावंत हिच्या आईचं दुसरं लग्न, राखीचं खरं नाव आणि ड्रामा क्वीनच्या भावंडांबद्दल तुम्हाला माहिती आहे... तिच्या कुटुंबात आहे तरी कोण-कोण?

राखी सावंत हिच्या कुटुंबाबद्दल मोठी माहिती समोर; ड्रामा क्वीनचं खरं नाव काय ?
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 30, 2023 | 10:11 AM
Share

मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकताच राखी सावंत हिच्या आईचं निधन झालं. आईच्या निधनानंतर राखी सावंतने आईचा रुग्णालयातील शेवटचा व्हिडीओ पोस्ट करत भावना व्यक्त केल्या. आईच्या निधनानंतर राखी सावंत हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. २०२१ मध्ये राखीच्या आईची कर्करोगावर शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हा अभिनेता सलमान आणि सोहेल खान यांनी आर्थिक मदत केल्याचा खुलासा खुद्द राखी हिने केला होता. आईच्या निधनानंतर राखीच्या कुटुंबाबद्दल चर्चा रंगत आहे.

राखी सावंत हिच्या वडिलांचं निधन १३ वर्षांपूर्वी झालं होतं. वडिलांच्या निधनानंतर राखीच्या आईने दुसरं लग्न केलं. राखीच्या आईने दुसरं लग्न पोलीस शिपाई आनंद सावंत यांच्यासोबत केलं. आईच्या दुसऱ्या लग्नानंतर राखीने स्वतःचं नाव बदललं. आईच्या दुसऱ्या लग्नापूर्वी राखीचं नाव नीरु भेडा असं होतं. २०१२ मध्ये राखीच्या दुसऱ्या वडिलांचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं.

असं सांगितलं जातं की, राखी सावंत हिला एक भाऊ आहे. राखी सावंतच्या भावाचं नाव राकेश सावंत असं आहे. राकेश सावंत एक दिग्दर्शक आहे. एवढंच नाही तर, राखी सावंत हिला एक बहीण देखील आहे. राखी सावंत हिच्या बहिणीचं नाव उषा असं आहे. उषा सावंत देखील इंडस्ट्रीचा एक भाग आहे. पण उषा सावंत कधीही राखी हिच्यासोबत दिसत नाही.

पण जेव्हा आईचं निधन झालं होतं, तेव्हा राकेश सावंत त्याठिकाणी उपस्थित होता. २८ जानेवारी २०२३ मध्ये राखी सावंतच्या आई जया भेडा यांनी जुहूच्या क्रिटीकेयर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. जया भेडा गेल्या अनेक दिवसांपासून ब्रेन ट्यूमर आणि कर्करोगशी झुंज देत होत्या.

पण राखीच्या आईची झुंज अपयशी ठरली. शनिवारी राखीच्या आईने अखरेचा श्वास घेतला. आईच्या निधनानंतर राखी पूर्णपणे कोलमडली आहे. आईच्या निधनानंतर राखी प्रचंड भावुक झाली आहे. राखी सतत आईच्या उपचारासाठी पैसे जमा करताना दिसत होती.

राखीच्या आई जया भेडा गेल्या दोन वर्षांपासून ब्रेन ट्यूमर आणि कर्करोगशी गंभीर आजारांशी झुंजत होत्या. पण त्यांची झुंज अपयशी ठरली. अनेकदा जया भेडा रोखीसोबत कार्यक्रमांमध्ये दिसल्या. दोघींचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. पण गेल्या दोन वर्षांपासून जया भेडा सोशल मीडियापासून दूर होत्या. पण आता त्यांच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

राखी सावंत सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर राखीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. एवढंच नाही तर, राखी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून राखा आदिल खान सोबत असलेल्या नात्यामुळे देखील चर्चेत आली आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच